दिल्ली। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे गुरुवारी (16 आॅगस्ट) ला दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिस्टलमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती दोन दिवसापासूनच चिंताजनक होती.
वाजपेयी हे भारताचे तीन वेळचे माजी पंतप्रधान होते. राजकारणा व्यतिरिक्त वाजपेयींना हॉकी हा खेळ अावडायचा. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना ही आवड शाळेत असल्यापासून लागली होती. त्याचबरोबर ते फुटबॉलचेही चाहते होते.
त्यांनी ते पंतप्रधान असताना 2001 मध्ये पहिल्या अॅफ्रो-एशियन गेम्सच्या मॉस्कोट शेरूचे अनावरण केले होते. या कार्यक्रमावेळी त्यावेळीचे केंद्रिय क्रि़डामंत्री उमा भारती आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडीही उपस्थित होते. ही स्पर्धा 3 ते 11 नोव्हेंबर 2001 ला पार पडली होती.
वाजपेयींनी 2004 ला पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघालाही खेल भी जितिये, दिल भी जितिये”(खेळही जिंका आणि मनेही जिंका) असा खास संदेश दिला होता.
वाजपेयींच्या निधनानंतर अनेक खेळाडूंनी त्यांच्या बद्दल सोशल मिडियावरुन भावना व्यक्त केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी
–खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश
–टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली