---Advertisement---

राहुलचे ‘लेडी लक’, अथियाने स्टेडियममधून केले चीयर; फलंदाजाने नॉटिंघम कसोटीत चोपल्या ११० धावा

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 10:38 AM
---Advertisement---

क्रिकेटचे आणि बॉलिवूडचे संबंध सर्वपरिचित आहेत. क्रिकेट सामन्यांसाठी खेळाडू बऱ्याचदा आपल्या परिवाराला सोबत घेऊन जात असतात. खेळाडूंच्या पत्नीही स्टेडियममध्ये येऊन आपल्या पतीला आणि संघाला चीयर करताना दिसतात. काही वेळा खेळाडू सुद्धा अर्धशतक किंवा शतक झळकावल्यानंतर आपल्या पत्नीकडे बघून सेलिब्रेशन करतात. असेच काहीसे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत घडले आहे.

झाले असे की, भारतीय संघातील काही खेळाडूंच्या पत्नींनी नॉटिंघम स्टेडियममधून भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना पाहतानाचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात सुनील शेट्टीची कन्या आथिया शेट्टीही दिसत आहे. आता ती तिथं काय करतेय? हा प्रश्न साहजिक आहे. तर ती आली आहे भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला प्रोत्याहित करण्यासाठी.

बऱ्याच दिवसापासून दोघांच्या नात्याविषयी चर्चा होत आहे की, दोघे एकमेकांना डेट करतायत. परंतु या चर्चांवर आता शिक्कामोर्बत झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे असले तरी दोघांनीही यावर अजून भाष्य केलेले नाही.

पण हीच अथिया राहुलसाठी ‘लेडी लक’ ठरताना दिसत आहे. कारण नॉटिंघम कसोटीत केएल राहुलने चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या पहिल्या डावात एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने संघासाठी उपयुक्त खेळी केली. २१४ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने त्याने ८४ धावा चोपल्या. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेऊ शकला. दुसऱ्या डावातही त्याने ३८ चेंडूंमध्ये २६ धावा जोडल्या आहेत. अशाप्रकारे पहिल्या कसोटी सामन्यात मिळून त्याने ११० धावा केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CSQs7xqJUHz/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान अथिया सुनील शेट्टीची मुलगी आहे. सलमान खान निर्मित हिरो या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अथिया शेट्टी, नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटातही दिसली होती. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

शूsss! बेयरस्टोला तंबूत धाडल्यानंतर सिराजने दाखवला ‘स्वॅग’, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

संघ सहकाऱ्याचा डिविलियर्सवर गंभीर आरोप; म्हणाला, ‘तो माझा हिरो होता, पण त्याने माझ्यासोबतच…’

एक षटक, ५ षटकार; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांने सर्वात अनुभवी बांगलादेशी गोलंदाजाची काढली पिसं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---