दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याच्याबद्दल सध्या अनेक वादग्रस्त गोष्टी घडताना दिसत आहे. नुकतेच गोलंदाज कागिसो रबाडा याने डिव्हिलियर्सवर वर्णद्वेषी भेदभाव केल्याचा गंभीर आरोप लावला होता. यानंतर आता डिव्हिलियर्सबद्दल आणखी एक नवीन गोष्ट ऐकायला मिळत आहे. आपल्याच संघ सहकारी खेळाडूला संघातून वगळल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर होत आहे. त्या खेळाडूने स्वतः अलीकडे यासंदर्भात खुलासा केला आहे.
डिव्हिलियर्सने ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपवली
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज खाया जोंडोने एबी डिव्हिलियर्सच्या कर्णधार पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. खरे तर, २०१५ सालच्या दक्षिण आफ्रिकाच्या भारत दौऱ्यादरम्यान डिव्हिलियर्स संघाचा कर्णधार होता. तेव्हा वनडे मालिका २-२ ने बरोबरीत आल्यानंतर शेवटच्या निर्णायक सामन्यात त्याने जोंडोला संघातून वगळले होते. जोंडोऐवजी डिव्हिलियर्सने डीन एल्गरला संघात स्थान दिले होते. अलीकडेच जोंडोने यांदर्भात एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘एबी डिव्हिलियर्ससाठी कसलाच आदर नाही‘
जोंडोने डिव्हिलियर्सवर संघातून बाहेर केल्याचे आरोप केले आहेत. डिव्हिलियर्सने आपल्याला बोलावले होते आणि भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळू नये म्हणून आपल्याला ताकिद दिली असल्याचे सांगितले आहे.
क्रिकइन्फोतील वृत्तानुसार जोंडो म्हणाला, “कर्णधार एबी डिव्हिलियर्सने मला एकांतात बोलावून सांगितले की, मी खेळू नये. तो मला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी आता डिव्हिलियर्सबद्दलचा सर्व आदर गमावला आहे. मी डिव्हिलियर्सला बालपणापासून माझा हिरो मानत होतो. पण त्याने माझ्यासोबतच असे केले. या प्रसंगानंतर माझ्या मनात त्याच्याविषयी कसलाच आदर उरलेला नाही.”
भारतातही अनेक चाहते आहेत
एबी डिव्हिलियर्सवर प्रेम करणारे लोक जगभरात आहेत. मात्र, त्याचे बहुतेक चाहते भारतात आहेत यात शंका नाही. एबी डिव्हिलियर्स दरवर्षी आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून (आरसीबी) खेळताना दिसतो. भारताचे लोक डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचे वेडे आहेत. त्याला जगभर प्रेमाने ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
एक षटक, ५ षटकार; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांने सर्वात अनुभवी बांगलादेशी गोलंदाजाची काढली पिसं
वाचलंत का? उर्वरित आयपीएल हंगामासाठी खूप कठोर आहेत ‘कोरोना प्रोटोकॉल’, चूकल्यास कारवाईही होणार
अखेर खाते उघडले! सलग चौथ्या पराभवातून थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलिया, ‘हा’ खेळाडू ठरला विघ्नहर्ता