---Advertisement---

स्वप्नातलं घर! अथिया- राहुलने मुंबईत घेतले आलिशान अपार्टमेंट; लग्नानंतर याच घरात राहण्याची तयारी

On: शुक्रवार, एप्रिल 22, 2022 8:52 PM
KL Rahul and Athiya Shetty
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते फार जवळचे आहेत. आजवर क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे अफेयर्स आणि लग्न झाल्याची बरीचशी उदाहरणे आपण ऐकली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही याचे उत्तम उदाहरण आहे. आता याच यादीत भारताचा धाकड सलामीवीर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचेही नाव लवकरच जोडले जाईल. जरी त्यांनी अद्याप त्यांच्यातील नात्याची कबुली दिली नसली तरीही त्यांची सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चा रंगत असते. दरम्यान राहुल आणि अथियाने मुंबईमध्ये एक लग्जरी अपार्टमेंट घेतले असल्याचे समजत आहे. 

राहुल (KL Rahul) आणि अथिया (Athiya Shetty) गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टखाली कमेंट करणे, राहुलला चीयर करण्यासाठी अथियाने स्टेडियममध्ये येणे, दोघांचे एकत्र दिसणे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यातील नात्याचा पुरावा देतात. काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२ च्या २०व्या सामन्यासाठी संपूर्ण शेट्टी परिवाराने हजेरी लावली होती. त्यामुळे राहुल आणि अथिया अधिकच चर्चेत आले होते.

सी-फेन्सिंग आहे अपार्टमेंट
अशात आता, मुंबईत त्यांनी एक महागडे अपार्टमेंट भाड्यावर घेतले असल्याची बातमी पुढे आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुल आणि अथियाने मुंबईच्या बांद्रातील कार्टर रोडवर एक अपार्टमेंट घेतले आहे. हे अपार्टमेंट सी-फेन्सिंग ४ बीएचके अपार्टमेंट आहे. बिल्डिंगमधील आठव्या मजल्यावर त्यांचे अपार्टमेंट असून त्याचे दर महिन्याचे भाडे १० लाख रुपये आहे. या जोडीच्या जवळच्या नातलगांनी या घराला त्यांच्या स्वप्नातले घर म्हटले आहे. तसेच लग्नानंतर हे दोघे याच अपार्टमेंटमध्ये राहण्याची योजना आखत असल्याचेही समजत आहे. 

केएल राहुल करतोय लखनऊ संघाचे नेतृत्त्व
विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर राहुलला भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. तो गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये नेतृत्त्वाचा भार सांभाळतोय. त्याने पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्त्व केले आहे. सध्या तो आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ संघाची धुरा सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली लखनऊने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘ओम फिनिशाय नम:’, पाकिस्तान, इंग्लंडसह जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांनी केले धोनीचे कौतुक, वाचा एका क्लिकवर

अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: रोहन स्ट्रायकर्स, वाडेश्वर विझार्डस संघांचा दुसरा विजय

सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए चॅम्पियनशिप सिरिज: अक्षज सुब्रमणियम, प्रिशा शिंदे यांना दुहेरी मुकुटाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---