इंग्लंड आणि भारत याच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत झाला असून दुसरा सामना गुरुवार (12 ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस केएल राहुलच्या नावावर राहिला. केएल राहुल लाॅर्ड्सच्या मैदानावर शतक करणारा या वर्षातील पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुल 127 धावांवर नाबाद आहे. त्याच्या या अप्रतिम शतकाचे त्याची प्रेयसी अथिया अथिया शेट्टी हिने कौतुक केले आहे.
केएल राहुलची कथित प्रेयसी अथिया शेट्टी हिने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अथियाने राहुलच्या शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ स्टोरीमध्ये टाकला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हृद्याचा इमोजीही टाकला आहे.
विशेष म्हणजे, केवळ अथिया नव्हे तर तिचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनेही त्याच्या शतकाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये राहुलला शुभेच्छा देत धन्यवादही म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहीले की, ‘क्रिकेटच्या मक्कामध्ये शतक, चांगला खेळलास बाबा. माझ्या वाढदिवशी मला अशी अप्रतिम भेट दिल्याबद्धल तुझे धन्यवाद.’
मुळात गेल्या काही महिन्यांपासून राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत. एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे अशा बऱ्याचशा गोष्टी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
100 at the Mecca of cricket! Well played baba 🖤 @klrahul11 pic.twitter.com/jID3GKTm7y
— Suniel Shetty (@SunielVShetty) August 12, 2021
इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी लाॅजिस्टीक विभाकडून सर्व खेळाडूंना त्यांच्या सोबत येणाऱ्या व्यक्तिंची नावे विचारली गेली होती. खेळाडूंना त्यांची पत्नी किंवा पार्टनरचे नाव द्यायचे होते. हिदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार बीसीसीआय जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंच्या प्रवासाचे नियोजन करत होते; तेव्हा राहुलने त्याची अथियाला पार्टनर सांगितले होते. तेव्हापासून दोघे इंग्लंडमध्ये सोबतच आहेत. दरम्यानचे त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर दिसले आहेत. यानंतर आता सुनील शेट्टी यांच्या प्रतिक्रियेनंतर राहुल आणि अथियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘नातं पक्कचं समजायच म्हणजे’! राहुलच्या शतकाने सुनिल शेट्टी इंप्रेस, अशी प्रतिक्रिया देत वेधले लक्ष
लॉर्ड्समध्ये रोहित-राहुल जोडीचे वादळ, शतकी भागिदारी करत मोडला ‘हा’ ६९ वर्षे जुना विक्रम
अष्टपैलू हार्दिकचा ‘किलर लूक’, नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसतोय अजूनच स्टायलिश; पत्नीही झालीय घायाळ