लंडन । येथे सुरु असलेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेत दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला निराशाजन पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला डेव्हिड गॉफिनने २-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले.
गेल्या ६ सामन्यात गॉफिन कधीही फेडररला पराभूत करू शकला नाही. परंतु आज त्याने जबदस्त खेळ करत फेडररला कोणतीही संधी दिली नाही. पहिला सेट ४-६ असा पराभूत झाल्यावर गॉफिनने पुढे फेडररवर एकहाती विजय मिळवला.
एटीपी फायनल्समध्ये गेल्या ८ वर्षात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला पराभूत करणारा गॉफिन पहिला खेळाडू बनला.
दुसऱ्या उपांत्यफेरीत ग्रिगोर दिमित्रोव्हने जॅक शॉकला ४-६, ६-०, ६-३ असे पराभूत केले.
फेडरर या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार समजला जात होता. त्याचा २०१७मधील हा केवळ ५वा पराभव आहे.
Australian Open 🏆
Indian Wells 🏆
Miami 🏆
Halle 🏆
Wimbledon 🏆
Shanghai 🏆
Basel 🏆Congratulations on a spectacular 2017, @rogerfederer…👏 pic.twitter.com/UoM7OZterk
— Tennis TV (@TennisTV) November 18, 2017
Roger Federer's season
🏆 Australian Open
🏆 Indian Wells
🏆 Miami
🏆 Halle
🏆 Wimbledon
F Montréal
QF US Open
🏆Shanghai
🏆 Basel
SF London WTFs— José Morgado (@josemorgado) November 18, 2017