टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात 10 गडी राखून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर खेळाडू व संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका होतेय. कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्रामुख्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. तसेच आता भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे देखील लवकरच वाहणार असल्याचे बोलले जातेय. त्याचवेळी माजी भारतीय अष्टपैलू अतुल वासन यांनी भारतीय संघाचा पुढील मेंटर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचे नाव घेतले आहे.
भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेकांनी प्रशिक्षकांत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. अतुल वासन यांनी थेट भारतीय संघासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी व कसोटी क्रिकेटसाठी वेगळे प्रशिक्षक नसावे असे म्हटले. ते म्हणाले,
“आपल्या संघासाठी कसोटी व टी20 मध्ये एकसारखे प्रशिक्षक नसावेत. तुम्ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंना टी20 खेळाडूंना मेंटर म्हणून नियुक्त करण्यास हरकत नाही. टी20 विश्वचषकात एबी डिव्हिलियर्सची सेवा मेंटर म्हणून आपण का घेऊ शकत नव्हतो? तो संघाला चांगली दिशा दाखवू शकतो.”
ते पुढे म्हणाले,
“टी20 क्रिकेटमध्ये तुम्हाला नव्या व युवा खेळाडूंची आवश्यकता आहे. 2007 मध्ये आपल्या संघात एकही स्टार खेळाडू नव्हता. तेव्हा त्याच युवा संघाने विजेतेपद पटकावलेले. आपण एक गैरसमज करून ठेवला आहे की, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू भारतीय संघासाठी देखील तशीच कामगिरी करेल. आज ही सत्य परिस्थिती आहे की, आपण मुख्य स्पर्धांच्या महत्त्वाच्या सामन्यात दबावाचा सामना यशस्वीरीत्या करत नाही.”
यापूर्वी हरभजन सिंग यानेदेखील भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता.
(Atul Wassan Want AB Devilliers As Team India Mentor)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”