भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) शुक्रवारी (२८ जानेवारी) सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये रहाणे शेतात असल्याचे दिसत आहे. रहाणेला शेतीची आवड असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. विशेषतः सेंद्रिय शेती त्याला अधिक आवडते. रहाणे आणि त्याच्या पत्नीता नेहमीच सेंद्रिय शेतीत तयार झालेली फळे आणि भाजीपाला खरेदी करण्याकडे कल असतो. रहाणेने या पोस्टमध्ये अशाच एका शेतातील फोटो शेअर केला आहे.
रहाणेने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून ही पोस्ट केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की “मेरे देश की धरती.” चाहत्यांकडून या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. तसेच चाहते कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्तही होत आहेत.
कमेंट्समध्ये चाहत्यांची अनेक प्रकारची मते समोर आली आहेत. काहींनी कॅप्शनमधील गाण्याच्या ओळी पूर्ण करत लिहिले की “सोना उगले, उगले हिरे मोती.” तर काहींनी त्याची फिरकी घेतली आहे. काही चाहते आहेत, ज्यांनी पोस्टवर कमेंट्स करत निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहिंनी त्याला देशाच्या धरतीवर धावा करण्याचा सल्लाही दिला आहे.
https://www.instagram.com/p/CZQ31iMPntN/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अजिंक्यच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तो सध्या भारतासाठी फक्त कसोटी प्रकारात खेळत आहे. खराब प्रदर्शनामुळे कसोटी संघातील त्याची जागाही धोक्यात आली आहे. भारतासाठी मर्यादित षटकांमध्ये त्याला संधी मिळत नसली, तर आयपीएमध्ये मात्र तो खेळतो. मागच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होता. दिल्ली संघासाठी त्याला अपेक्षित धावा करता आल्या नाहीत.
आयपीएलमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससोबत कारकिर्दीची सुरुवात केली होती, पण नंतर २०१२ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. राजस्थान संघासाठी त्याला २०१२ मध्ये सर्व १६ सामने खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्याने ५६० धावा केल्या होत्या. २०१६ आणि २०१७ मध्ये त्याने रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिथित्व केले, त्या दोन वर्षात राजस्थान रॉयल्सवर बंदी घातली गेली होती. २०१६ मध्ये त्याने ४८० धावा केल्या होत्या.
२०१८ च्या लिलावात राजस्थानने त्याला पुन्हा एकदा विकत घेतले, पण तो या हंगामात अपेक्षित खेळी करू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सने त्याला २०२० मध्ये संघात सामील केले. दिल्लीसाठी त्याने मागच्या दोन हंगामात निराशाजनक प्रदर्शन केले आहे. अशात २०२२ च्या मेगा लिलावात त्याला कोणता संघ विकत घेतो?, ही गोष्ट पाहण्यासारखी असेल.
महत्वाच्या बातम्या –
बल्ले..बल्ले..! भाऊ युसूफने ब्रेट लीला मारला ९५ मीटरचा षटकार, आनंदाने इरफानचा मैदानातच भांगडा
व्हिडिओ पाहा –