---Advertisement---

…यादिवशी होणार घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ साठी लिलाव

On: गुरूवार, मार्च 12, 2020 2:04 PM
---Advertisement---

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ (Ghatkopar Kabaddi Premier League Season 3) ला लवकरच सुरू होत आहे. मुंबई उपनगर मधील एक नावाजलेली कबड्डी लीग आहे. आजी-माजी कबड्डीपटूच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कबड्डी लीग तिसऱ्या यशस्वी पर्वाकडे वाटचाल करीत आहे. शनिवार दिनांक १४ मार्च २०२० रोजी तिसऱ्या पर्वा साठी लिलाव होणार आहे.

घाटकोपर, पूर्व-पश्चिम मुंबई उपनगरातील अधिकृत संस्थाचे खेळाडूंसाठी सदर लीगचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम, द्वितीय श्रेणी पुरुष गट व कुमार गट मुले अश्या तिन्ही गटातील खेळाडूंचा सहभाग करून संघ तयार करण्यात येतात. दोन यशस्वी पर्वा नंतर तिसऱ्या पर्वाची पूर्व तयारी सुरू झाली आहे.

९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२० दरम्यान या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लीग मध्ये यंदा १० संघ सहभागी होणार आहेत. १० संघाच्या १२० खेळाडूसाठी संघ निवडप्रक्रिया १४ मार्च २०२० रोजी दुपारी ३:३० वाजल्यापासून कपोल वाडी हॉल, घाटकोपर (प.) मुंबई -८४ येथे पार पडणार आहे. या निवडप्रक्रियेत एकूण १६० खेळाडु सहभागी होणार आहेत. संघ निवडताना संघमालकास १२ खेळाडूंची एकूण ३०,००० रक्कम दिली जाईल. खेळाडूंची बोली १,००० रुपया पासून सुरू होईल.

घाटकोपर लीग मध्ये यंदा १० संघ सहभागी होणार असून त्याचे २ गटात विभाजन करण्यात येणार आहे. गटातील इतर चार संघान विरुद्ध सामने खेळेल. तर दुसऱ्या गटातील २ संघान विरुद्ध सामने खेळातील. १० पैकी ८ संघ हे बादफेरीत प्रवेश करतील.

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश जंगम, सरचिटणीस श्री. सचिन जाधव, खजिनदार श्री. सुनील खोपकर, कार्याध्यक्ष श्री. हेमंत तोडणकर, नियोजन समिती चे श्री. प्रवीण गावडे व श्री. मिलिंद कदम तसेच घाटकोपर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लीग यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---