---Advertisement---

गौरव स्त्रीशक्तीचा! पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर महिलांसाठी खास सन्मान सोहळा

On: गुरूवार, जून 12, 2025 3:31 PM
Rohit Pawar in MCA press conference
---Advertisement---

महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून ‘औरत हैं तो भारत हैं’ हा कार्यक्रम 15 जून रोजी एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. रायगड रॉयल्स संघाचे मालक कपिल बाहेती आणि अलिशा बाहेती यांच्या संकल्पनेतून, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार आणि सर्व ॲपेक्स बॉडी सदस्यांच्या सक्रिय पाठिंब्याने या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे.

या उपक्रमाचा उद्देश महिलांना केवळ एक प्रेक्षक म्हणून नव्हे, तर एक सन्माननीय घटक म्हणून पुढे आणण्याचा आहे. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना विशेष आमंत्रण दिलं जातं. यासोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांनाही खास पाहुण्या म्हणून स्टेडियममध्ये आमंत्रित केलं जातं. त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण स्टेडियम गुलाबी रंगाने सजवलं जातं, ज्यामुळे एक उत्साही आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याबरोबरच, त्यांच्या सक्षमीकरणासाठी रायगड रॉयल्स व एमसीएतर्फे विशेष घोषणा व उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना केवळ सन्मानित केलं जात नाही, तर त्यांना खेळाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं व्यासपीठही दिलं जातं. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि उद्योजकतेसारख्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करून, या उपक्रमामुळे हजारो महिलांना नव्या उंचीची प्रेरणा मिळते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमाचा भाग व्हावं, असं आवाहन एमसीए अध्यक्ष रोहित पवार व रायगड राॅयल्स यांच्याकडून करण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---