अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) या आठवड्यात औपचारिक घोषणा करेल. सत्ताधारी तालिबानने महिला क्रिकेटवरील बंदी उठवली नाही तर, ते अफगाणिस्तान विरूद्ध खेळणार नाहीत, असे सीएने स्पष्ट केले आहे. एका अहवालानुसार, क्रिकेट टास्मानियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉमिनिक बेकर यांनी रेडिओ स्टेशन ट्रिपल एमला सांगितले की, या संदर्भात औपचारिक घोषणा लवकरच अपेक्षित आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना बेकर म्हणाले की,
“या आठवड्यात अफगाणिस्तान विरुद्धची कसोटी पुढे ढकलल्याची औपचारिक घोषणा केली जाईल.
ते महिलांच्या खेळांना परवानगी देत नाहीत हे मान्य नाही. जर त्यांना स्पर्धात्मक पुरुष खेळ खेळायचा असेल विशेषत: क्रिकेट विश्वात, त्यांना काय करावे लागेल याचा पुनर्विचार करावा लागेल. देशात महिला क्रिकेट सुरू राहणार नाही,” असे तालिबानने म्हटले आहे.
बेकर म्हणाले की, “अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारल्यास, कसोटी सामना आयोजित करण्याचा मार्ग खुला राहील. ही एकमेव कसोटी सुरुवातीला २०२० मध्ये होणार होती. परंतु, कोविड-१९ महामारीमुळे या वर्षी २७ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
खेळाडूंनी केले स्वागत
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने सामना पुढे ढकलण्याच्या सीएच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. असोसिएशनने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये जे घडत आहे तो मानवी हक्कांचा प्रश्न आहे ज्यामुळे क्रिकेटच्या खेळावरही परिणाम होतोय. आम्हाला रशीद खानसारखे खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना बघायला आवडेल. मात्र, जर रोया समीम आणि तिच्या सहकाऱ्यांना समान सामना खेळण्याची संधी मिळाली नाही तर, या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचा विचार केला जाऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
त्यावेळी मॉर्गनने विश्वचषक उचलण्यास नकार द्यायला हवा होता, सेहवागचा इंग्लिश कर्णधाराला टोला
“सौरभ तिवारीकडे बघितले तर तो सूर्यकुमार आणि इशानपेक्षा धावा काढण्याची जास्त भूक दाखवत आहे”
स्कूप शॉटच्या नादात स्मिथने स्वत:लाच लागून घेतला चेंडू, मग केली अशी कृती की, मीम्स होतायेत व्हायरल