सिडनीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने 36 धावांत 4 विकेट घेत लक्षवेधी कामगिरी केली होती. मात्र ब्रिसबेनमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात तो अपयशी ठरला होता. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकत तीन टी20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.
या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात कृणालला फलंदाजी करताना 4 चेंडूत 2 धावा करता आल्या तेव्हा भारताला विजयासाठी 13 धावांची गरज होती. तर गोलंदाजीतही त्याने एकही विकेट न घेता भारताकडून 4 षटकात सर्वाधिक 55 धावा दिल्या.
कृणालला पहिल्या सामन्यातील कामगिरीमुळे चाहत्यांच्या अनेक टीकांना सामोरे जावे लागले. यातच त्याचा भाऊ आणि भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानेही त्याचे हसे केले.
“मी आणि हार्दिक सहसा क्रिकेटवर बोलत नाही. मात्र माझी ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी बघून तो पण हसत होता. तसेच त्यानेही चांगली कामगिरी नाही केली तर मी त्याचा टर उडवतो”, असे कृणाल तिसऱ्या सामन्यानंतरच्या पत्रकार सभेत म्हणाला.
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये ( इंडियन प्रीमियर लीग) सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या कृणाला आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी हवी होती.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्याच टी20 सामन्यात कृणालने निराशा केली. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेत टीकाकरांची तोंडे बंद केली. यावेळी तो आॅस्ट्रेलियामध्ये टी20 सामन्यात चार विकेट घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. तसेच दुसऱ्या सामन्यातही 4 षटकात 26 धावा देत 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेटमध्ये मिशेल स्टार्क आणि एलिसा हेली जोडप्याने केला खास विक्रम
–२०२२ राष्ट्रकूल स्पर्धेत क्रिकेटला मिळू शकते स्थान
–कारकिर्दीच्या शिखरावर असताना मलाही मिताली राज प्रमाणे संघातून वगळले- गांगुली






