अफगाणिस्तान संघ विश्वचषक विश्वचषक 2023च्या 39व्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करताना अफगाणी खेळाडूंनी अप्रतिम फॉर्म दाखवला आणि ऑस्ट्रेलियाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या. पहिल्या पाच फलंदाजांपैकी ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघआने 5 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या सुरुवातीच्या सहा विकेट्स अवघ्या 87 धावांवर गमावल्या. पावरप्लेची 10 षटके संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या 4 विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यांची धावसंख्या 54 होती.
292 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड यांनी अनुक्रमे 18 आणि शुन्य धावा खर्च करून विकेट्स गमावल्या. मिचेल मार्श याने 24, तर मार्नस लॅबुशेन याने 14 धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक फलंदाज जोश इग्लिस याने पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता विकेट गमावली. मार्नस लॅबुशेन याच्या रुपात ऑस्ट्रेलियन संघाला सहावा झटला बसला, ज्याने अवघ्या 6 धावांचे योगदान संघासाठी दिले. डावातील 19व्या षटकात मिचेल स्टार्क याच्या रुपात ऑस्ट्रेलियाला सातवा झटला बसला. (AUS vs AFG । Afghanistan sent Australia’s batting order into the tent cheaply)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढण्यासाठी सचिनने केली मदत, शतकी खेळीनंतर इब्राहिमने मानेल मास्टर ब्लास्टरचे आभार
ऐतिहासिक क्षण! 21 वर्षीय इब्राहिमसाठी आख्खं वानखेडे स्टेडियम राहिलं उभं, देशासाठी पहिलीच वर्ल्डकप सेंच्युरी