---Advertisement---

ऑस्ट्रेलियान यष्टीरक्षक ऍलेक्सचा नादच खुळा! कसोटी पदार्पणात केला धोनी, गिलख्रिस्टलाही न जमलेला जबराट विक्रम

On: शनिवार, डिसेंबर 11, 2021 4:22 PM
Alex-Carey
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) संघांमध्ये सध्या ऍशेस मालिकेचा थरार सुरू आहे. नुकताच या मालिकेतील पहिला सामना संपला असून, या सामन्यात यजमानांनी ९ विकेट्सने बाजी मारली आहे. यासह ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या या विजयात कर्णधार पॅट कमिन्स आणि फलंदाज ट्रॅविस हेड यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्याबरोबरच यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी (Wicketkeeper Alex Carey) यानेही संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

ऍशेस (Ashes Series)मधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून ऍलेक्सने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले. या सामन्यात त्याने सर्वाधिक झेल पकडत इतिहास रचला.

ऍलेक्सने इंग्लंडच्या पहिल्या डावात डेविड मलान, जोस बटलर आणि ऑली रॉबिन्सन यांना यष्टीमागून झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याच्या यष्टीरक्षणाची कमाल पाहायला मिळाली. त्याने या डावात इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स यांचा झेल टिपला. त्यानंतर कर्णधार जो रूटलाही त्याने झेल टिपत पव्हेलियनला धाडले. पुढे जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना यष्टीमागून झेलबाद करत त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.

ऍलेक्स कसोटी पदार्पणात सर्वाधिक झेल घेणारा जगातील पहिलावहिला यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni), ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) अशा मातब्बर यष्टीरक्षकांनीही कसोटी पदार्पणात ही अद्वितीय कामगिरी करता आली नव्हती. 

या ८ विकेट्ससह ऍलेक्सने इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक ख्रिस रिड (Chris Read) आणि माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ब्रायन टॅबर (Brian Taber) यांची बरोबरी केली आहे. या दिग्गजांनीही त्यांच्या कसोटी पदार्पणात ८ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु यामध्ये एका यष्टीचीत विकेटचाही समावेश होता.

कसोटी पदार्पणात सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टिरक्षक:
८ : ब्रायन टॅबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, १९६६
८ : ख्रिस रीड विरुद्ध न्यूझीलंड, बर्मिंगहॅम १९९९
८ : ऍलेक्स कॅरी विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्बेन २०२१

दरम्यान ऍलेक्सला आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कसोटी संघात जागा मिळवण्यासाठी जवळपास ३ वर्षे वाट पाहावी लागली आहे. त्याने त्याने जानेवारी २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्याच्या पुढील महिन्यातच त्याला टी२० पदार्पणाचीही संधी मिळाली होती. परंतु कसोटी पदार्पणाची त्याला ३ वर्षांचा कालावधी लागला आहे. आपल्या या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात त्याने ८ विकेट्सबरोबर २१ धावाही केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Photo: जसा बाप, तसा मुलगा…! आपल्यापासून दूर असलेल्या मुलाशी धवनचा व्हिडिओ कॉलद्वारे प्रेमळ संवाद

धक्कादायक! सरावानंतर २७ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अहमदनगरमधील घटना

ऋतुराजची शतकांची हॅट्रिक! महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना विजय हजारे ट्रॉफीत पाडलाय धावांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---