---Advertisement---

बेन स्टोक्सची फिल्डिंग पाहून भले-भले थक्क! संघाला मिळवून दिला सलग दुसरा विजय

On: बुधवार, ऑक्टोबर 12, 2022 9:55 PM
Ben Stokes
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स बुधवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. उभय संघातील हा सामना कॅनबरामध्ये खेळला गेला असून इंग्लंडने ८ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा ह सलग दुसरा विजय असून तीन सामन्यांची ही टी-20 मालिकाही पाहुण्या संघाने नावावर देखील केली आहे. 

इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती आणि यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैल बेन स्टोक्स (Ben Stokes ) याचे चांगलेच कौतुक झाले. इंग्लंड संघ गोलंदाजी करत असताना स्टोक्सने खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. ऑस्ट्रेलियच्या डावातील 12 व्या षटकात थ्याे सीमारेषेजवळ हवेत मोठी उडी मारून संघाचा चार धावा नक्कीच फायदा करून दिला. या षटकात सॅम करन (Sam Curran) गोलंदाजी करत होता, तर मिचेल मार्श (Mitchell Marsh) स्ट्रेईकवर होता.

मिशेल मार्श त्यावेळी 11 चेंडू खेळला होता आणि 22 धावाही केल्या होत्या. त्याच्यासोबत मार्कस स्टॉयनिस दुसरी बाजू सांभाळून होता. करनने टाकेलेल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मार्शने षटकारासाठी मोठा शॉट खेळला. चेंडू सीमारेषेपार जवळपास गेलाच होता, पण मार्शचे दुर्दैव असे की, त्याठिकाणी स्टोक्स उभा होता. स्टोक्सने चेंडू सीमारेषेपार जाईल, असे वाटत असतानाच एक मोठी उडी मारली आणि चेंडू हातात पकडला. त्याने हा चेंडू झेललाच होता, पण तो सीमारेषेपार जाणार असल्यामुळे चेंडू मैदानात फेकावा लागला. त्याने याठिकाणी दाखवेलेली चपळाई पाहून स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षक उभा राहून टाळ्या वाजवू लागले. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. चाहते कमेंट्समध्ये स्टोक्सचे कौतुकही करत आहेत.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडसाठी डेविड मलान आणि मोईन अली यांनी झंजावाती खेळी केली. इंग्लंडसाठी मार्कस स्टॉयनिसने सर्वात तीन विकेट्स घेतल्या, तर ऍडम झंपाने 2 बळी नावावर केले. इंग्लंडकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सच्या नुकसानावर 170 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंग्लिश गोलंदाजांमध्ये सॅम करून तीन विकेट्ससह सर्वात यशस्वी ठरला. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO | भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सूर्यकुमार भाऊंचा दरारा, विराटने केला टोपण नावाचा खुलासा
झंझावाती शतकासह ‘या’ खेळाडूने ठोकली टीम इंडियात कमबॅकची दावेदारी; आयपीएलमध्येही मारलेल मैदान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---