Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला

व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Travis-Head

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात तिसरा वनडे सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलिया संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना तब्बल 221 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यातील शानदार फलंदाजीसाठी ट्रेविस हेड याला सामनावीर पुरस्काराने, तर डेविड वॉर्नर याला मालिकेतील कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, सामन्यादरम्यान ट्रेविस हेडने असा काही षटकार खेचला, ज्यामुळे वॉर्नरही अवाक् झाला होता. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने 48 षटकांच्या सामन्यात 5 विकेट्स गमावत 355 धावा चोपल्या. या डावात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी या सामन्यातील सातव्या षटकापर्यंत एकही षटकार मारला नव्हता. तसेच, संघाची धावसंख्या फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर पुढे सरकत होती.

मात्र, सातवे षटक टाकत असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेविड विली (David Willey) याच्या दुसऱ्याच चेंडूवर ट्रेविस हेड (Travis Head) याने खणखणीत षटकार खेचला. हा शॉट इतका जबरदस्त होता की, पाहून डेविड वॉर्नर (David Warner) हादेखील हैराण झाला. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

Smoked! #AUSvENG pic.twitter.com/osTN0YB2pu

— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2022

ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नरचे शतक
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडले. ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 269 धावांची भागीदारी रचली. यामध्ये ट्रेविसच्या 152 आणि वॉर्नरच्या 106 धावांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हे आव्हान पार करताना इंग्लंडचा डाव 142 धावांवर संपुष्टात आला. तसेच, हा सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 221 धावांनी आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील एकाही सामन्यात इंग्लंडला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे ही मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली. (aus vs eng 3rd odi watch travis head hits massive six against David Willey david warner shocked see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय
जो विक्रम आतापर्यंत कधीही बनला नाही, तो अर्शदीप अन् सिराज जोडगोळीने रचला; एकदा वाचाच


Next Post
fOOTBALL

मॅचवीक ७: जबरदस्त पुनरागमन, थरारक निकाल आणि शंभरावा गोल!

Rishabh-Pant

'आता पंतला हाकलण्याची वेळ आलीये', रिषभच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया

Photo Courtesy: Twitter

FIFA WORLD CUP: मेस्सीच्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का! दुबळ्या सौदी अरेबियाने चारली धूळ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143