ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात होणारी प्रतिष्ठित ऍशेस मालिका (Ashes Series) काही दिवसांपूर्वीच पार पडली. ऑस्ट्रेलियाने ४-० च्या फरकाने ही मालिका खिशात घातली. त्यानंतर आता रविवारी रोजी (३० जानेवारी) महिलांच्या एकमेव ऍशेस कसोटी (Women Ashes) सामन्याचा निकाल लागला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला संघांमध्ये कॅनबेरा येथे झालेला ऐतिहासिक ऍशेस सामना अनिर्णीत राहिला (Draw) आहे.
हा सामना खूप रोमांचक राहिला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड संघाला शेवटच्या चेंडूवर १२ धावांची गरज होती. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त एक विकेट हवी होती. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार मेग लेनिंन हिने संघातील सर्व क्षेत्ररक्षकांना फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षणास उभे केले. परंतु स्ट्राईकवर असलेल्या केट क्रॉसने शेवटचा चेंडू खेळून काढला आणि सामना अनिर्णीत केला.
इंग्लंड महिला संघांने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्स ३३७ धावा अशा स्थितीत असताना डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सलामीवीर रिचेल हायनेस (८६ धावा) आणि कर्णधार मेग लॅनिंन (९३ धावा) यांनी मोठ्या खेळी केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २९७ धावांवर गारद झाला.
What an unbelievable game of cricket!
Four days of action coming down to the final ball, defended by Kate Cross for the draw to keep the Women's #Ashes series alive! pic.twitter.com/3BYVpGgMFq
— ICC (@ICC) January 30, 2022
It's a draw!
What a final day 🙌#Ashes pic.twitter.com/KJbYB4g9hZ
— 7Cricket (@7Cricket) January 30, 2022
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुन्हा दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी करत २१६ धावांवर डाव घोषित केला. परिणामी इंग्लंडला विजयासाठी २५७ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी चांगली खेळी करत शेवटच्या दिवसापर्यंत २२८ धावा. सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या ३ विकेट्स बाकी होत्या आणि विजयासाठी १८ चेंडूत १७ धावा करायच्या होत्या. इंग्लंडसाठी हा विजय सोपा दिसत होता. परंतु ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू अलाना किंगने एका षटकात २ विकेट्स घेत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर टाकले.
त्यामुळे इंग्लंडला आता विजयासाठी १२ चेंडूत १३ धावा काढायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना १३ चेंडूत फक्त १ धाव काढू दिली. परंतु त्यांना इंग्लंडची उरलेली एक विकेट घेता आली नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ रोहित भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेईल; विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने गायले गुणगान
…अन् गोलंदाजाला चक्क संघनायकापुढे जोडावे लागले हात, व्हिडिओ पाहून जाणून घ्या प्रकरण
हेही पाहा-