---Advertisement---

वनडे मालिकेत ‘या’ तिघांना बसावे लागू शकते बाकावर; गिलचाही समावेश

On: मंगळवार, नोव्हेंबर 24, 2020 11:47 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका होणार आहेत. वनडे मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होईल. पहिले दोन वनडे सामने सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळविले जातील. तिसरा आणि शेवटचा वनडे सामना २ डिसेंबर रोजी कॅनबरा येथे खेळला जाईल. भारताच्या वनडे संघात यावेळी नियमित उपकर्णधार रोहित शर्माचा समावेश नाही. रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. रोहित नसला, तरी भारतीय फलंदाजी फळी मजबूत आहे.

वनडे मालिकेसाठी भारताने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील या संघात अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. परंतु वनडे मालिकेत असे काही खेळाडू असतील ज्यांना कदाचित एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे, मालिकेत फक्त तीन सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे सर्व १५ खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

आम्ही आज तुम्हाला अशाच तीन खेळाडूंविषयी सांगणार आहोत, ज्यांना कदाचित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत भारताकडून खेळण्याची संधी मिळणार नाही.

१. शुबमन गिल

भारताचा उदयोन्मुख फलंदाज शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट आहे. गिलची सलामीवीर म्हणून संघात निवड झाली आहे. अनुभवी शिखर धवन व आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात राहिलेला केएल राहुल भारताच्या सलामीची धुरा सांभाळून शकतात. त्यांच्यानंतर, या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौर्‍यावर सलामीला फलंदाजी केलेल्या मयंक अगरवालचा क्रमांक लागू शकतो. त्यामुळे, गिलला सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

भारताच्या मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर व मनीष पांडे यांच्यासारखे अनुभवी फलंदाज असल्याने, गिलला या तीन सामन्यांच्या मालिकेत बाकावर बसावे लागू शकते.

२. कुलदीप यादव

युजवेंद्र चहलसोबत गेली तीन वर्ष भारताच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणाऱ्या कुलदीप यादवला यावेळी संपूर्ण मालिकेत संघाबाहेर राहावे लागू शकते. भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून चहलला प्रथम संधी मिळू शकते. तसेच, दुसरा फिरकीपटू म्हणून अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात येईल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असल्याने, भारतीय कर्णधार व संघ व्यवस्थापन तीन फिरकीपटू खेळवण्याची जोखीम पत्करू शकत नाही.

कुलदीपसाठी आयपीएल २०२० अत्यंत निराशाजनक ठरली होती. स्पर्धेतील सुरुवातीचे सामने खेळल्यानंतर, त्याला खराब कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने पुढील सामन्यातून वगळले होते.

३. शार्दुल ठाकूर

मुंबईकर शार्दुल ठाकूरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत संधी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. शार्दुल भारतीय संघात वेगवान गोलंदाजांच्या भुमिकेत खेळतो. मात्र, संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांच्यासारखे वेगवान गोलंदाज असल्याने शार्दुलला बाकावर बसावे लागू शकते.

शार्दुलचा वेग इतर गोलंदाजांपेक्षा काहीसा कमी असल्याने, तो अंतिम अकरामध्ये क्वचितच खेळू शकतो. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये शार्दुलची कामगिरी संमिश्र राहिली होती.

ट्रेंडिंग लेख-

टीम इंडियाचं हे ‘त्रिकुट’ उडवू शकतं ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सर्वाधिक दांड्या

श्वास रोखून धरा! आगामी वनडे मालिकेत ‘हे’ तीन भारतीय पाडू शकतात धावांचा पाऊस

बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित

महत्त्वाच्या बातम्या-

‘गती वाढवण्यासाठी मला ड्रग्ज घेण्यास सांगितले होते’, ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरचा मोठा खुलासा

‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, स्वतःशीच सामना करण्यासाठी तयार’, भारतीय घातक वेगवान गोलंदाजाची प्रतिक्रिया

टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---