भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना भारतीय फलंदाजीवर पहिल्या डावात दबाव टाकला होता. भारतीय संघाच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा पॅट कमिन्सचा शिकार झाला होता. याबद्दल चेतेश्वर पुजाराने आपल्या बाद होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने सांगितले की, तो आपल्या धावसंख्येत अजून भर घालू शकला असता. मात्र पॅट कमिन्सने असा चेंडू टाकला होता. ज्याला कोणी सुद्धा खेळू शकला नसता. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुजारा म्हणाला, “मला जो चेंडू टाकण्यात आला होता. तो या मालिकेतील सर्वश्रेष्ठ चेंडूंपैकी एक होता. मला वाटले मी कोणताच चांगला प्रयत्न करू शकलो नसतो, भले ही मी शतक किंवा द्विशतक करून फलंदाजी करत असेल. मला नाही वाटत, मी त्या चेंडूपासून बचाव करू शकलो असतो.”
पुजारा म्हणाला, “मला उंचीमुळे मागून किक लागली. मला तो चेंडू खेळायचा होता. त्यामध्ये चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली होती. यासाठी फक्त तो एक चेंडू होता, जो खरतर चांगला होता आणि दुर्दैवाने मी त्याच्यापासून दूर राहू शकलो नाही. आपल्याला हे स्विकारले पाहिजे.”
पुजारा आभासी पत्रकार परिषदेत म्हणाला,” पॅट कमिन्स नंबर 1चा कसोटी गोलंदाज आहे. तो वारंवार हे सिद्ध करत आहे. तो या ट्रॅकवर ही कठोर मेहनत घेत आहे, ज्या ठिकाणी जास्त मदत मिळत नाही. त्याला या खेळपट्टीचा चांगल्या प्रकारे अंदाज आहे.”
पुजारा पहिल्या डावाबद्दल म्हणाला की, “रिषभ पंत बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव प्रभावित झाला. तो पर्यंत आम्ही सामन्यात होतो. तो बाद झाल्याने मी सुद्धा चांगल्या चेंडूवर माझी विकेट गमावली. मग काही धावबाद झाले. आमचा उद्देश 330-340 धावांच्या जवळ होता. हो, आम्ही ते साध्य करण्यात चूकलो. अजिंक्य रहाणेला पहिल्या सत्रात गमावणे हा एक मोठा झटका होता. परंतु आम्ही त्यातून सावरलो होतो आणि रिषभ पंत सोबत चांगली भागीदारी झाली होती. ”
महत्त्वाच्या बातम्या –
‘विरुष्का’च्या मुलीचा पहिला फोटो? सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल, पाहा
टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ ‘हा’ खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर
भारतीय संघ ‘या’ एका अटीवर ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळण्यात तयार