सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आजपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 303 धावा केल्या आहेत.
या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आहे. तो पहिल्या दिवसाखेर 250 चेंडूत 130 धावांवर नाबाद आहे. त्याचे या मालिकेतील हे तीसरे शतक आहे. त्याने याआधी अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात आणि मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक केले आहे.
यामुळे एक खास योगायोग पुजारा आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 2014-15 ला झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने 4 शतके केली होती. विशेष म्हणजे विराटनेही ही शतके अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी कसोटीत केली होती.
2014 -15 च्या या मालिकेत विराटने अॅडलेड ओव्हल मैदानावर दोन्ही डावात शतके केली होती. तर मेलबर्न आणि सिडनी या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात प्रत्येकी एक शतक केले होते.
पुजारा आणि विराटमधील आणखी एक योगायोग म्हणजे विराटने 2014 -15 च्या या मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक केले नव्हते. पण त्याने त्याव्यतिरिक्त तीनही सामन्यात शतके केली होती. पुजारानेही सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात शतक केलेले नाही. पण त्याने बाकी तीनही सामन्यात शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे टीम इंडिया १०० टक्के जिंकणार सिडनी कसोटी
–बॅटवर स्टिकर, बाॅडीवर टॅटू नसलेला मयांक अगरवाल राहुल- विजयला सरस
–षटकारांची बरसात करत त्या खेळाडूने मोडला हिटमॅनचा हिट विक्रम