---Advertisement---

AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ नवखा खेळाडू ठरणार भारतीय संघाची डोकदुखी, घ्या जाणून

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 5:45 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी एका नव्या खेळाडूची निवड व्हावी, असं ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंना वाटत आहे. आणि तो नवा खेळाडू म्हणजे विल पुकोवस्की आहे.

विक्टोरियाच्या विल पुकोवस्की या 22 वर्षीय युवा खेळाडूने शेफिल्ड शिल्डमध्ये लागोपाठ दोन दुहेरी शतकं ठोकली आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबात 255 आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 202 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्क याने पुकोवस्कीला भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत उतरवावे, असे म्हटले आहे.

माजी खेळाडूंच्या मते पुकोवस्कीला मिळावी संधी
पहिला विश्वचषक होण्यापूर्वी (1971-1975) ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषवलेले इयान चॅपल यांनी म्हटले की, “ऑस्ट्रेलियाचा सध्याचा सलामीचा फलंदाज जो बर्न्स असमाधानकारक कामगिरी करीत आहे. त्याने मागील सामन्यांत 32 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे पुकोवस्कीला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे.”

विल पुकोवस्कीने प्रथम श्रेणीत खेळताना 21 सामन्यांत 51.03 च्या सरासरीने 5 शतकांच्या मदतीने 1480 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामी फलंदाज मार्क वॉ आणि माजी कर्णधार किम ह्युज यांच्याही मते जो बर्न्सच्या जागी विल पुकोवस्कीला सलामीला पहिल्याच सामन्यापासून संधी द्यायला पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर

-कोहलीला RCBची कॅप्टन्सी सोड म्हणण्यामागे गंभीरचा ७ वर्षांपुर्वीचा राग ? अंपायरपर्यंत गेले होते प्रकरण

-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण

ट्रेंडिंग लेख-

-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत

-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---