मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये द्विपक्षीय मालिका जिंकली आहे.
या मालिकेत तीन या आकड्याचा खास योगायोग दिसून आला आहे. सर्वाधिक 8 विकेट घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला तीन वेळा बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या दोघांनी मिळून या मालिकेत तीन वेळा 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
त्याचबरोबर झे रिचर्डसन या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने तीन वेळा भारतीय कर्णधार विराट कोहलीची शिकार केली आहे. तसेच मालिकावीर ठरलेल्या यष्टीरक्षक एमएस धोनीनेही 3 अर्धशतके केली आहेत. या मालिकेत त्याने भारताकडून सर्वाधिक 193 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–आठ वर्षांनी मालिकावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या धोनीचा असाही एक विक्रम
–एमएस धोनीने अखेर ‘ती’ खास शंभरी गाठलीच!
–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील अशी आहे एमएस धोनीची खास कामगिरी