टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत शनिवारी (22 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड हा सामना सिडनीमधील एससीजी मैदानावर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. न्यूझीलंडने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये एका विकेटच्या नुकसानावर 65 धावा चोपल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये खेलेली हा सर्वीत मोठी धावसंख्या ठरली.
पॉवरप्लेच्या सहा षटकांदरम्यान न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन याने तुफान फटकेबाजी करत 16 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. मात्र, चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जोस हेझलवूडने ऍलनला त्रिफळाचित केले. पॉवरप्ले संपला तेव्हा केन विलियम्सन 4 व डेवॉन कॉनवे 19 धावांवर खेळत होते. न्यूझीलंडच्या फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा चांगलाच घाम काढला. पण ही काही पहीली वेळ नाही, जेव्हा न्यूझीलंडने पॉवरप्ले मध्ये अशा प्रकारे वादळी खेळी आहे. याआधी देखील टी-20 विश्वचषकात त्यांनी बऱ्याच वेळा पॉवरप्लेमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने अनेकदा गाजवला आहे पॉवरप्ले –
आज न्यूझीलंड संघाने त्यांच्या टी20 विश्वचषक इतिहासात पॉवरप्लेमधील सर्वात मोठी धावसंख्या केली. त्यांनी पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून 65 धावा केल्या. त्याआधी त्यांनी 2016 साली खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध बिनबाद 58 धावा केलेल्या. त्याच विश्वचषकात पाकिस्तानविरूद्ध त्यांनी बिनबाद 55 धावा केलेल्या. टी20 विश्वचषक 2009 मध्ये आयर्लंड विरूद्ध एक गडी गमावत 52 धावा केल्या. त्यानंतर 2021 च्या टी20 विश्वचषकात स्कॉटलंड विरूद्ध दोन बाद 52 धावा केल्या होत्या.
सामन्याचा आढावा:
पॉवरप्ले मधील 65/1 या धावसंख्येनंतर केन विलियम्सन व डेवॉन कॉनवे यांनी धावफलक चालता ठेवला. कॉनवेने धमाकेदार फलंदाजीच प्रदर्शन केले. त्याने 58 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांच्या सहाय्याने 92 धावा केल्या. त्याला जिमी नीशम याने सुरेख साथ दिली. त्याने 13 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. 20 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 200 अशी होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लेट पण थेट! 2007 ते 2022, न्यूझीलंडने चार वेळा केला ऑस्ट्रेलियाचा दौरा, पण शेवटी ऑस्ट्रेलियाला लोळवलंच
महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम