आगमी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्कस स्टॉइनिसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम, स्टॉइनिसने विस्फोटक फलंदाजी केली आणि नंतर गोलंदाजी करताना 3 बळी घेतले.
केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओमानचा गोलंदाजीचा निर्णय पहिल्या डावातील पहिल्या 10 षटकांसाठी प्रभावी वाटत होता, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गियर बदलून आक्रमक फलंदाजी सुरु केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 20 षटकात 5 विकेट गमावत 164 धावा केल्या आणि ओमानला 165 धावांचे लक्ष्य दिले. गोलंदाजीत मेहरन खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले.
त्यानंतर धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरुवात निराशाजनक झाली होन्ही सलामी फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. प्रतिक आठवलेला मिटेल स्टार्कने गोल्डन डकवर परत पाठवले, तर कश्यप प्रजापतीही स्वस्तात बाद झाला त्याने 16 चेंडूंचा सामना करत केवळ 7 धावा केल्या. सलग अंतरावर विकेट्स पजत राहिल्याने ओमान संघाला मर्यादित 20 षटकात 9 गडी गमावून 125 धावा करता आल्या. संघासाठी अयान खानने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पाने प्रत्येकी 2-2 गडी टिपल्या.
सामन्यानंतर मार्कस स्टॉइनिसनला सामनावीरचे पुरस्कार मिळाले. स्टॉइनिसने अष्टपैलू खेळी खेळत संघासाठी मोलाचे योगदान दिले. त्याने 186.11 च्या स्ट्राईक रेटने 36 चेंडूत 67 धावा केल्या, ज्यामध्ये 2 चाैकार 6 उत्तुंग षटकारंचा समावेश होता. तर गोलंदाजीत त्याने सर्वाधिक 3 षटकात 19 धावा देत 3 महत्तवाच्या विकेट्स घेतल्या.
महत्तवाच्या बातम्या-
आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर बातमी
पहिल्याच सामन्यात भारताचा एकतर्फी विजय! आयर्लंडचा 8 विकेट्सनं उडवला धुव्वा
बाबर आझम एमएस धोनी नाही! पाकिस्तानच्या अहमद शहजादनं दिलं तिखट उत्तर