ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. उभय संघातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 360 धावांनी विजय मिळवला. मालिकेत मिचेल मार्श सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाकिस्तानसाठी पदार्पणाच्या सामन्यात अमिर जमाल याने अप्रतिम प्रदर्शन केले, पण पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही.
पाकिस्तनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात मोठा पराभव स्वीकारावा लागला. पण अमिर जमाल चर्चेचा विषय ठरला. अनेकांसाठी ही आश्चर्याची बाब ठरत आहे की, आमिर आधी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण त्याने क्रिकेटची आवड कमी होऊ दिली नाही. प्रतिकूल परिस्थितीत देखील वेगवान गोलंदाजाने क्रिकेट खेळणे बंद केले नाही आणि गुरुवारी (14 डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्यात अखेर पाकिस्तानसाठी पदार्पण केले. पहिल्या डावात त्याने 6, तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.
उभय संघांतील हा पहिला कसोटी सामना पर्थ स्टेडियमवर खेळला गेला. याचठिकाणी आमिरने दिलेल्या मुलाखतीत आपला प्रवास सांगितला. टॅक्सी ड्रायरव्हर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण हा प्रवास नक्कीच आमिरसाठी सोपा नव्हता. त्याने अनेकदा असा विचार केला होता की, अटचणींमुळे त्याला पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळता येणार नाही. पण असे असले तरी, त्याने प्रयत्न मात्र सोडले नाहीत. मुलाखतात आमिर म्हणाला, “अनेकांनी मला क्रिकेट खेळणे बंद कर असे सांगितले. तसा दबाव टाकला जात होता. काहीच काही मिळण्याच्या अपेक्षा नाहीत, असे म्हणत होते. पण अपेक्षा आणि आशा नेहमी असतेच.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 113.2 षटकात 487 धावांपर्यंत मजल मारली होती. पण पाकिस्तान संघ मात्र 101.5 षटकांमध्ये 271 धावा करून सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी अधिक मजबूत केले. शेवटच्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 450 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण संघ अवघ्या 30.2 षटकात 89 धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या डावात इमाम उल हक (62) याने अर्धशतक केले होते.
त्याव्यतिरिक्त संपूर्ण सामन्यात पाकिस्तानचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने पहिल्या डावात 164 धावांची अप्रतिम खेळी केली होती. तसेच मिचेल मार्श याने 90 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. मार्शने दुसऱ्या डावात देखील 63 धावांची खेळी केली. तसेच उस्मान ख्वाजा याने 90 धावा करून विकेट गमावली. मार्शने गोलंदाजाच्या रुपात पहिल्या डावात 2, तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या.
या विजयानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान मेलबर्नमध्ये खेळला जाईल. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी यादरम्यान सिडनीत आयोजत केला गेला आहे. (AUS vs PAK 1st test From taxi driver to stunning debut in Test cricket, Amir Jamal’s inspiring journey)
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमधल्या ‘या’ संघाने रोहितमध्ये दाखवली होती रुची, एका गोष्टीमुळे फिसकटली डील
भारतीय संघाला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूची वर्णी