ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व स्पष्ट दिसत होते. यजमानांनी हा सामना एक डाव आणि 182 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (29 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क रागात दिसला. तो जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा आफ्रिकेचा फलंदाज सारखा क्रिझ सोडत होता. यावेळी स्टार्ककडे त्याला बाद करण्याची संधी होती, मात्र त्याने त्याला केवळ ताकीद दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झाले असे की, दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 17 व्या षटकात हे घडले. थुनिस डी ब्रुइन (Theunis de Bruyn)
चेंडू टाकण्याआधीच क्रीझ सोडत होता. त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही तो क्रीझ सोडत होता. त्यावेळी मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने चेंडू नाही टाकला आणि ब्रुइनकडे रागाने पाहत म्हणाला, ‘क्रीझवर राहणे काही अवघड नाही.’
Starc said "Stay in the crease, it's not that hard".pic.twitter.com/UwYATAjCRZ
— Johns. (@CricCrazyJohns) December 29, 2022
मागे वळून पाहिले तर भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने इंग्लंडच्या नॉन-स्ट्रायकर असलेल्या चार्लोट डीन हिला मंकडींगने बाद केले होते. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या त्या वनडे सामन्यात भारत जिंकला होता, मात्र सामन्यानंतरही इंग्लंडने अनेक आजी माजी खेळाडू दीप्तीच्या बाद करण्याच्या प्रकारावर नाराजी दर्शवत होते.
मंकडींगमध्ये भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याचे नाव सर्वात पुढे आहे. त्याने इंग्लंडच्या जोस बटलर याला 2019च्या आयपीएलमध्ये असेच काहीसे बाद केले होते. यामुळे दीप्तीनंतर पुन्हा एकदा ही बाब चर्चेत आली होती.
दीप्ती-डीन प्रकरणानंतर मेरिलबोन क्रिकेट क्लबने नियमांमध्ये सुधारणा केली. त्या नियमांमध्ये म्हटले गेले की मंकडींगने बाद होणाऱ्या खेळाडूला धावबाद म्हटले जाईल. यामध्ये एमसीसीने फलंदाजांना देखील उद्देशून लिहिले, जोपर्यंत गोलंदाज चेंडू टाकत नाही त्यांनी क्रीझ सोडू नये.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 189 धावा केल्या. त्या बदल्यात यजमानांनी 575 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव सुरू 204 धावसंख्येवरच संपुष्टात आला. आता हे दोन्ही संघ सिडनीमध्ये 4 ते 8 जानेवारी, 2023मध्ये तिसऱ्या सामन्यात भिडणार आहेत. AUS vs SA 2nd Test Mitchell Starc warns Theunis de Bruyn
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद शशीकुमारला वाईल्ड कार्ड प्रदान
मानलं गड्या! भारतीय उपखंडात अशी अद्वितीय कामगिरी करणारा एकमात्र विदेशी फलंदाज बनला विलियम्सन