• About Us
सोमवार, मे 29, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद शशीकुमारला वाईल्ड कार्ड प्रदान

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद शशीकुमारला वाईल्ड कार्ड प्रदान

वेब टीम by वेब टीम
डिसेंबर 29, 2022
in टेनिस, टॉप बातम्या
0
Mukund Sasikumar

File Photo


पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेसाठी भारताचा अव्वल मानांकित खेळाडू मुकुंद शशीकुमार याला वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देताना स्पर्धेच्या संयोजकांनी पुरुष एकेरीत भारताच्या प्रतिनिधित्वाची खात्री केली.

चेन्नई येथील 25 वर्षीय शशीकुमार हा या स्पर्धेतील पहिला वाईल्ड कार्ड धारक ठरला असून अत्यंत खडतर अशा एकेरी ड्रॉ मध्ये माजी ग्रँड स्लॅम विजेता मरीन चिलीच व गतवर्षीच्या उपविजेता एमिल रुसुव्होरी यांच्यासह जगातील अव्वल मधील 17 खेळाडूंचा समावेश आहे.

याविषयी बोलताना स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले की, भारतात होणारी ही स्पर्धा असल्यामुळे भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत अत्यावश्यक अशी संधी मिळवुन देऊन त्यांना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुकुंद शशीकुमार हा सध्याचा अव्वल मानांकित भारतीय खेळाडू असून त्याला वाईल्ड कार्ड द्वारे या स्पर्धेत प्रवेश देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मायदेशातील प्रेक्षकांसमोर तो चमकदार कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

यावेळी बोलताना अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुध्द खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे टाटा ओपन महाराष्ट्रसारख्या स्पर्धेत हीच संधी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणारी ठरेल. मुकुंद शशी कुमार हा भारतातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असून भारतीय खेळाडूंच्या सहभागाला आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन बहुमोल अनुभव मिळवण्याची संधी तो निश्चितच साधेल.

मुकुंद याने सप्टेंबर महिन्यात पोर्तुगाल आयटीएफ स्पर्धा जिंकताना पाच वर्षातील पहिलेच विजेतेपद मिळवले. तसेच, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या इजिप्त येथील आयटीएफ स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले. टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद दुसऱ्यांदा मुख्य ड्रॉ मध्ये खेळत असून या स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात तो पहिल्यांदा सहभागी झाला होता. जागतिक क्रमवारीत 340व्या स्थानावर असलेल्या मुकुंदला गेल्या सत्रात पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. भारताचा युकी भांब्री हा सुद्धा पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत खेळणार आहे.

टेनिस शौकिनांना आपली तिकीटे zoonga.com वर आरक्षित करता येणार आहे. तसेच व्हाय कॉम 18 स्पोर्टस् हे या स्पर्धेचे अधिकृत प्रक्षेपण भागिदार आहेत. मुख्य स्पर्धेतील सर्व सामने स्पोर्टस् 18- 1, स्पोर्टस् 18-1 एचडी आणि जिओ सिनेमा या वर पाहता येतील.

तीन वेळेची ग्रँड स्लॅम विजेता जोदी राजीव राम आणि जॉय सलीसबरी यांच्यासह अनेक अव्वल जोड्यांचा सामावेश अलयमुळे स्पर्धेतील पुरुष दुहेरी विभागातही चुरशीची स्पर्धा पहावयास मिळेल.

आयएमजीच्या मालकीच्या व राईज यांच्या कडून व्यवस्थापन करण्यात आलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने भारत सरकारच्या सहकार्याने केले आहे. टाटा मोटर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या 31 डिसेंबर पासून सुरू होणार असून तर मुख्य स्पर्धा 2 ते 7 जानेवारी दरम्यान रंगणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहन बागानने गाजवले घरचे मैदान, एफसी गोवाला पराभूत करून पटकावले तिसरे स्थान
मानलं गड्या! भारतीय उपखंडात अशी अद्वितीय कामगिरी करणारा एकमात्र विदेशी फलंदाज बनला विलियम्सन


Previous Post

मोहन बागानने गाजवले घरचे मैदान, एफसी गोवाला पराभूत करून पटकावले तिसरे स्थान

Next Post

VIDEO: अरे, क्रीझवर राहा की! मिशेल स्टार्कची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला वॉर्निंग

Next Post
Mitchell Starc warns Theunis de Bruyn (AUSvSA)

VIDEO: अरे, क्रीझवर राहा की! मिशेल स्टार्कची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला वॉर्निंग

टाॅप बातम्या

  • कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर देशभरात संतापाची लाट! ऑलिम्पिक विजेते समर्थनार्थ मैदानात
  • IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?
  • पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
  • “तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया
  • अखेर अहमदाबादमध्ये पावसाचाच खेळ! बहुप्रतिक्षित आयपीएल फायनल सोमवारी, इतिहासात प्रथमच घडली घटना
  • WTC फायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ 2 खेळाडूंवर अवलंबून, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली नावे
  • VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
  • पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा! आता कसा रंगू शकतो निर्णायक सामना, लगेच वाचा
  • ‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल
  • हार्दिकच्या नेतृत्वाबाबत इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाले, “मला माहित नाही पण…”
  • रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
  • PRICE MONEY । चॅम्पियन बनणाऱ्या संघावर कोट्यावधींची बरसात, हारले तरी होणार करोडपती
  • आयपीएल फायनलपूर्वी महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई! सट्टेबाजीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त
  • सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
  • वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा येणार सोन्याचे दिवस? कोच बनताच सॅमीने बनवलाय ‘मास्टर प्लॅन’
  • धोनीचे पाचव्या IPL ट्रॉफीचे स्वप्न राहणार अपूर्ण? पांड्याचा रेकॉर्ड पाहून थालाप्रेमींना लागेल 440 व्होल्टचा शॉक
  • आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
  • नो टेन्शन! फायनलसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचो सोडून ट्रिपल सीट फिरताना दिसला आशीष नेहरा
  • अंपायरच्या टोपीवर ते मैदानाच्या छतावर, IPL सामन्यात 4-5 नव्हे तर तब्बल 50 कॅमेरे लावतात, जाणून घ्या
  • महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In