नुकतीच विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत सामना खिशात घातला आणि सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब नावावर केला. अशात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला एका मुलाखतीत, 70 वर्षांनंतर मृत्यूच्या क्षणी विश्वचषक 2023 अंतिम सामन्यातील कोणत्या क्षणाचा विचार करशील? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने विराट कोहली याच्या विकेटचा उल्लेख केला. आता पॅट कमिन्सचे विधान चर्चेत आहे.
भारतीय (Team India) संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याची विकेट एखाद्या सामन्याची दिशा बदलण्यासाठी खूपच महत्त्वाची असते. जेव्हा विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामन्यावेळी पॅट कमिन्स (Pat Cummins) याने विराटला बाद केले होते, तेव्हा संपूर्ण स्टेडिअममध्ये शांतता पसरली होती. तसेच, कोट्यवधी भारतीयांना धक्का बसला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या गेलेल्या सामन्याला तब्बल 92 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.
काय म्हणाला कमिन्स?
कमिन्स याने प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, “मला वाटते की, विराट कोहलीची विकेट. मी त्यावेळी खूपच उत्साही होतो. विकेट पडल्यानंतर आम्ही एकत्र उभे होतो. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, सर्वांना एका सेकंदासाठी प्रेक्षकांना ऐका आणि आम्ही एका क्षणाचा पॉज घेतला, तेव्हा मैदानावर ग्रंथालयासारखी शांतता होती. स्टेडिअममध्ये उपस्थितीत 1 लाख भारतीय एकदम शांत होते. मी दीर्घ काळ त्या क्षणाचा आनंद घेईल.”
Question – in 70 years time, what is the moment you will think of from that 2023 World Cup Final?
Pat Cummins – Virat Kohli's wicket. (The Age). pic.twitter.com/wfNnjBR8nN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 27, 2023
विराटची खेळी
पॅट कमिन्स याने विराट कोहली याला 54 धावसंख्येवर तंबूत पाठवले होते. विराटच्या या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड मजबूत करणे सुरू केली होती. भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 240 धावांवर बाद केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता. ट्रेविस हेड अंतिम सामन्याचा हिरो ठरला होता. त्याने 137 धावांची वादळी शतकी खेळी साकारली होती. (aussie captain pat cummins nominates virat kohli world cup 2023 final wicket for his deathbed moment 70 years from now)
हेही वाचा-
IPL: प्रतिभावान खेळाडूला रिलीज करून गुजरातने केली मोठी चूक! दुसऱ्याच दिवशी वेगवान शतक ठोकून घडवला इतिहास
IPL 2024: मुंबईकडून 17.50 कोटींना घेतलेल्या ग्रीनला RCBकडून खास रोल, संघाच्या संचालकाने दिली माहिती