सध्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील बादफेरीतील सामने अजूनही बाकी आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. वॉर्नरने निवृत्तीविषयी मोठी अपडेट दिली आहे. निवृत्ती कधी घेणार, हे त्याने सांगितले आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) याच्यानुसार, टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेनंतर तो याविषयी विचार करेल. वॉर्नर म्हणाला की, तो पूर्णपणे फिट आहे आणि त्याला पुढेही खेळायचे आहे. विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत वॉर्नरची बॅट चांगलीच तळपत आहे. तो स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात 55.44च्या सरासरीने 499 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 1 अर्धशतक निघाले आहे. अशात वॉर्नर पुढेही असेच प्रदर्शन करेल, याची संघाला अपेक्षा असेल.
काय म्हणाला वॉर्नर?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वॉर्नरला त्याच्या निवृत्तीविषयी विचारण्यात आले. यावर त्याने प्रतिक्रिया देत म्हटले की, “ब्रॅड हॉग 40हून अधिक वयापर्यंत खेळत राहिला. ख्रिस गेल आणि शोएब मलिकनेही असेच केले. मी अजूनही खूपच फिट आहे. या उन्हाळ्यानंतर मी स्वत:ला थोडा वेळ देऊ इच्छितो, जेणेकरून मला विचार करण्याचा वेळ मिळेल. माझे ध्येय आहे की, मी टी20 विश्वचषकापर्यंत खेळावे. मला वाटते की, यानंतर मी निर्णय घेईल की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये काय करायचे आहे.”
ऑस्ट्रेलिया संघासाठी वॉर्नरने खूपच जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याने 2021च्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. संघाला विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला होता. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नरची भूमिका महत्त्वाची असेल. (aussie opener david warner will think about his future after the 2024 t20 world cup)
हेही वाचा-
World Cup Semifinal: ‘रोहित न्यूझीलंडविरुद्ध ठरणार…’, माजी खेळाडूची भारतीय कर्णधाराबद्दल मोठी प्रतिक्रिया
World-cup Semifinal: टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टेन्शनमध्ये, पाहा कुणी केलाय दावा