टी२० विश्वचषकाला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली. पात्रता फेरीनंतर सुपर १२ फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा खेळला गेला. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असला तरी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
फिंचच्या नावावर नकोसा विक्रम
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी सलामी दिली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्याच षटकात वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए याने त्याला कगिसो रबाडाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने पाच चेंडूंचा सामना करताना एकही धाव काढली नाही. त्याचबरोबर त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
कर्णधार म्हणून टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना फिंच २०१८ पासून सातव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, बांगलादेशाचा कर्णधार मोहम्मदुल्लाह, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन प्रत्येकी दोन वेळा खाते न खोलता बाद झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या षटकात विजय
दुबई येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ११८ धावांमध्ये गुंडाळला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही किफायतशीर गोलंदाजी करताना सामन्यात रंगत निर्माण केली. अखेरच्या षटकात विजयासाठी आठ धावांची आवश्यकता असताना मार्कस स्टॉयनिसने दोन चौकार मारत ऑस्ट्रेलियाला विजयी केले. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यांत आत्तापर्यंत कुणाचे वर्चस्व, आकडे देतात धक्कादायक माहिती
‘भारत विजेतेपदाचा दावेदार असला, तरी प्रबळ दावेदार नाही’, माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य
‘युवराजला वाटले श्रीसंत कदाचित झेल सोडेल’, रोहितने दिला २००७च्या अंतिम सामन्याच्या आठवणींना उजाळा






