---Advertisement---

IND vs AUS | ‘ते अशाच मानसिकतेने खेळतात’, स्मिथच्या वक्तव्यानंतर सराव सामन्याविषयी बोलला अश्विन

On: रविवार, फेब्रुवारी 5, 2023 4:52 PM
R Ashwin test
---Advertisement---

चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही बॉर्डर गावसकर ट्रॉफी 9 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघ भारतात सराव सामना खेळण्याची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ याने बीसीसीआयवर निशाणा साधत त्यांचा संघ सराव सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता स्मिथच्या या प्रतिक्रियेवर भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भारत दौऱ्यावर एकही सराव सामना न खेळण्याच्या निर्णयावर ऑस्ट्रलियन दिग्गज स्टीव स्मिथ (Steve Smith) म्हणाला होता की, “सराव सामन्यात बीसीसीआयकडून त्यांना ग्रीन टॉप (गवत असलेली खेळपट्टी) मिळाले असते. पण प्रत्यक्ष कसोटी सामन्यातवेळी मात्र खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर असती. अशात सराव सामना न खेळण्याचा ऑस्ट्रेलियन संघाने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.”

स्मिथने दिलेल्या माहितीनुसार 2017 साली तो भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला ग्रीन टॉप खेळपट्टी मिळाली होती. पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी मात्र सराव सामन्यातील खेळपट्टीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. यावेळी हीच गोष्ट लक्षात ठेवून संघ सराव सामना खेळत नसल्याचे स्मिथने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया संघ सध्या सराव सत्रावर लक्ष केंद्रित करत आहे आणि फिरकी गोलंदाजी खेळण्याचा फलंदाजांना तयार करत आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ही सर्वात मोठी बाधा असेल. अश्विनची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील कामगिरी जबरदस्त राहिली आहे.

स्मिथच्या प्रतिक्रियेवर बोलताना अश्विन म्हणाला की, “ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अशाच प्रकारच्या मानसिकतेसह खेळायला आवडते. ही त्यांची क्रिकेट खेळण्याची शैली देखील आहे. मागच्या भारत दौऱ्यातील पुणे कसोटीत खेळप्टटीव फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल दिसली होती. कोणताच संघ अशा पद्धतीची योजना बानवू शकत नाही.”

“ऑस्ट्रेलियन संघ या दौऱ्यात एकही सराव सामना खेळत नाहीये आणि यात नवीन काहीच नाही. भारतीय संघ देखील काही विदेश दौऱ्यांमध्ये सराव सामना खेळत नाही. आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता भारताला देखील अनेकदा सराव सामना खेळणे शक्य होत नाही,” असेही अश्विन पुढे बोलताना म्हणाला. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या 18 कसोटी सामन्यांमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ही आकडेवारी पाहता आगामी कसोटी मालिकेत देखील पाहुण्या संघासाठी तो मोठी बाधा असेल. ऑस्ट्रेलियाने अश्विनचा सामना करण्यासाठी हुबेहूब त्याच्यासारखी गोलंदाजी करणाऱ्या महेश पिथिया याला सराव सत्रात सामील केले आहे. (‘Australia always play with the same mind set’, Ravichandran Ashwin reacts ahead of Test series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींना देवाज्ञा, दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
जेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रपतीही झालेले ‘माही’च्या हेअरस्टाईलचे फॅन, सर्वांसमोर केली होती ‘ही’ खास विनंती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---