इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 हंगामाची सुरुवात झाली. ऍशेस 2023 हंगामातील देखील हा पहिलाच सामना होता. शुक्रवारी (16 जून) सुरू झालेला हा सामना मंगळवारी (20 जून) ऑस्ट्रेलियाने जिंकला. शेवटच्या षटकांमध्ये इंग्लंडचे गोलंदाज विकेट्स घेऊ शकले नाहीतच, पण गोलंदाजांकडून एक दुसरी चूक देखील झाली. षटकांची गती राखता आली नाही, म्हणून आयसीसीने दोन्ही संघांवर मोठी कारवाई केली आहे.
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेलेल्या निवेदनात सांगितले की, “आयसीसी एलीट पॅनलचे मॅच रेफरी एँडी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांवर अपेक्षेपेक्षा दोन षटके कमी टाकल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि इंग्लंडचा कर्णदार बेन स्टोक्स (Ben Stokes) या दोघांनीही हे आरोप मान्य केले आहेत. याचाच अर्थ असा होतो की कोणत्याही औपचारीक सुनावणीची आवश्यकता नाहीये.”
ऍशेस 2023 (Ashes 2023) चा हा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडला 2 विकेट्सने पराभूत केले. डब्ल्यूसीच्या नव्या हंगामातील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय असून त्यांना यासाठी 12 गुण मिळाले. मात्र, आयसीसीने षटकांची गती न राखल्यामुळे दोन्ही संघांवर दोन डब्ल्यूटीसी गुणांची कारवाई केली आहे. अशात डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची गुणसंख्या 10 झाली आहे. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या इंग्लंडला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. इंग्लंडची गुणसंख्या -2 झाली आहे.
आयसीसीकडून दोन्ही संघांच्या खेळाडूंवर देखील मोठी कारवाई केली गेली आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळमाऱ्या मॅच फीजपैकी 40 टक्के रक्कम आयसीसीकडून कापली गेली आहे. एका षटकासाठी 20 टक्के रक्कम कापली जाते. एजबस्टन कसोटीत दोन्ही संघांकडून दोन संघांकडून दोन-दोन षटके कमी टाकली केल्यामुळे खेळाडूंची 40 टक्के मॅट फीज कापली गेली आहे. ऍशेस मालिकेचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या विजयासह 0-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर 28 जून ते 2 जुलैदरम्यान खेळला जाणार आहे. (Australia and England have been handed after the first #Ashes Test. )
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना डिवचणे ‘बार्मी आर्मी’ला पडले महागात! वॉर्नरने ‘विराट स्टाईल’ने केली बोलती बंद!
सबका बदला लेगा तेरा कॅप्टन! बड्या बाता मारणाऱ्या रॉबिन्सनला दिला ऑस्ट्रेलियन दणका