मिशेल स्टार्कला संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती !
आज ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी आणि टी२० मालिकेसाठी संघ घोषित करण्यात आला. अष्टपैलू जेम्स फॉल्कनरला भारताच्या दौर्यासाठी एकदिवसीय संघात सामील करण्यात आले आहे.
१७ सप्टेंबरपासून सुरू होणार्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यासाठी मिशेल स्टार्कला विश्रांती देण्यात आली आहे. स्टार्कला पायाच्या दुखापतीतून उभारण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात आणि या संघात ५ बदल करण्यात आले आहेत.
ख्रिस लिन, जॉन हेस्टिंग्स, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क आणि मोझेस हेन्रीकस हे ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातील खेळाडू या भारताच्या दौऱ्यात नसतील. त्यांच्या जागी जेम्स फॉल्कनर आणि नॅथन कल्टर-नील यांना निवडण्यात आले आहे. फॉल्कनर ऑस्ट्रेलियाच्या २०१५ विश्व्चषक विजेत्या संघात होता. टी -२० आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथच करेल.
एकदिवसीय संघ
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन अगर, हिल्टन कार्टराईट, नॅथन कॉल्टर-नील, पॅट्रिक कमिन्स, जेम्स फॉल्कनर, ऍरॉन फिंच, जोश हाझलवूड, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोनीस, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.
टी -२० संघ
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहेरेन्डोरफ, डॅन ख्रिस्टियन, नॅथन कॉल्टर-नील, पॅट्रिक कमिन्स, ऍरॉन फिंच, ट्रॅव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.