---Advertisement---

राशिदची झुंज अपयशी! रोमांचक सामन्यात अफगाणिस्तान पराभूत; ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

On: शुक्रवार, नोव्हेंबर 4, 2022 5:20 PM
Austrlia-Cricket-Team
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या ‌‌‌‌‌‌टी20 विश्वचषकात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) दिवसातील दुसरा सामना यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. ऑस्ट्रेलियाला आपल्या उपांत्य फेरीचा आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात विजयाची गरज होती. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटी ऑस्ट्रेलियाने शानदार खेळ दाखवत 4 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे त्यांची उपांत्य फेरीत जाण्याची संधी अजूनही कायम आहे.

 

ऍडलेड ओव्हल येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार नबी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.‌ त्याचा हा निर्णय योग्य ठरला. डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून ग्रीन हे ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. मात्र, मिचेल मार्शने 45 धावांची आक्रमक खेळी केली. स्टॉयनिसने 25 धावांचे योगदान दिले. मात्र, ग्लेन मॅक्सवेलने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाला 168 पर्यंत पोहोचवले.

स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या अफगाणिस्तान संघासाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता.‌ गुरबाज याने सलामीला येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण केले. तो 30 धावा करत बाद झाल्यानंतर, इब्राहिमने 26 नईबने 39 धावा चोपल्या. 49 चेंडूंवर 70 धावांची गरज असताना अफगाणिस्तान संघ सामन्यात पुढे होता. मात्र, ऍडम झंपाच्या एकाच षटकात तीन बळी गेल्याने अफगाणिस्तान संघ सामन्यात मागे ऑस्ट्रेलिया सहज सामना जिंकणार असे वाटत असतानाच राशिद खान याने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज देत 23 चेंडूंवर आक्रमक 48 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात स्टॉयनिसने 22 धावांचा बचाव करत असलेल्या चार धावांनी विजय मिळवून दिला. अ गटातील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत केल्यास या गटातून न्यूझीलंड व इंग्लंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. श्रीलंकेने विजय नोंदवल्यास ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचे तिकीट पक्के करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---