ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना 72 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ व वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
Australia ensure a series victory with another thumping win 👏
Watch the #AUSvENG ODI series LIVE on https://t.co/MHHfZPzf4H (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/C3d30LtqwI pic.twitter.com/YKAfDhghSz
— ICC (@ICC) November 19, 2022
मालिकेतील पहिला सामना नावावर केलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात महत्त्वाचा बदल केला. नियमित कर्णधार पॅट कमिन्सने विश्रांतीचा निर्णय घेत जोस हेजलवूडकडे नेतृत्व सोपवले. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने देखील विश्रांतीला प्राधान्य दिले. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी मोईन अलीने सांभाळली.
सिडनी येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वॉर्नर व हेड हे संघाचे दोन्ही सलामीवीर 20 धावांचा टप्पा पार करू शकले नाहीत. मात्र, त्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ व मार्नस लॅब्युशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. लॅब्युशेनने 58 धावांचे योगदान दिले. स्मिथने आपला शानदार फॉर्म कायम राखत 94 धावांची उत्कृष्ट खेळी केली. अखेरीस मिचेल मार्श याने ताबडतोब 50 धावा कुटत ऑस्ट्रेलियाला 8 बाद 280 अशी मजल मारून दिली. इंग्लंडसाठी आदिल रशीद याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. मिचेल स्टार्क याने पहिल्याच षटकात जेसन रॉय व डेव्हिड मलान यांना खातेही न खोलू देता तंबूचा रस्ता दाखवला. 34 धावांवर तीन गडी बाद झालेले असताना सॅम बिलिंग्स व जेम्स विन्स या जोडीने शतकी भागीदारी केली. ते दोघे अनुक्रमे 60 व 71 धावा करून बाद झाल्यानंतर इतर फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. अखेरीस इंग्लंडचा डाव 208 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी स्टार्क व ऍडम झंपा यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. स्टार्क याला सामनावीर म्हणून घोषित केले गेले.
(Australia beat England By 72 Runs Sealed ODI Series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पदार्पणात फ्लॉप ठरलेल्या गिलच्या पाठीवर धोनीने ठेवलेला हात; स्वतः सांगितला तो किस्सा
चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी