Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदार्पणात फ्लॉप ठरलेल्या गिलच्या पाठीवर धोनीने ठेवलेला हात; स्वतः सांगितला तो किस्सा

November 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Facebook/Indian Cricket Team

Photo Courtesy: Facebook/Indian Cricket Team


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याचा कारकीर्दीत युवा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ओळखला जात होता. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला अनेक दर्जेदार खेळाडू मिळाले आहेत. सध्या भारतीय संघाचा भाग असलेला युवा सलामीवीर शुबमन गिल याला देखील त्याच्या पदार्पणावेळी धोनीने पाठिंबा देत त्याचे मनोबल वाढवलेले. गिलने एका कार्यक्रमात स्वतः याबाबत खुलासा केला.

भारतीय संघाचा युवा सलामीवर असलेला गिल मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. सध्या तो भारतीय संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. त्याचवेळी त्याने एका पंजाबी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याच्या पदार्पणाचा किस्सा सांगितला होता.

In conversation with Sonam Bajwa, Shubman Gill recalls his debut match against NZ and MS Dhoni's kind gesture towards him. ❤️ pic.twitter.com/NJ9rwKaqa9

— Shubman Gill FC (@shubmangillfans) November 18, 2022

 

शुबमन म्हणाला,

“भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा माझे वय 18 19 वर्षांचे होते. मी भारतासाठी पदार्पण केले त्या सामन्यात मी केवळ नऊ धावा करू शकलेलो. सोबतच संघाने सामना देखील गमावलेला. यानंतर मी चांगलाच निराश झालेलो. मी नाराज होऊन एका कोपऱ्यात बसलेलो पाहून धोनी माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, अरे चिंता कशाला करतो माझे पदार्पण तुझ्यापेक्षाही खराब होते. त्यानंतर त्याने थोडेफार विनोद केले ज्यामुळे माझा मूड चांगला झाला. मी खरेच हैराण होतो की, इतका मान्यवर खेळाडू माझ्यासोबत येऊन स्वतः बोलत आहे.”

गिलने 2019 मध्ये न्यूझीलड दौऱ्यावर वनडे पदार्पण केले होते. विशेष म्हणजे त्याला भारतीय संघाची कॅप धोनी याच्याच हातून दिली गेलेली. यात तो केवळ नऊ धावा करून बाद झालेला. तर दुसरीकडे धोनी 2003 मध्ये बांगलादेश विरुद्ध पदार्पण करताना एका चेंडूचा सामना करून एकही धाव न करता धावबाद झालेला. मात्र, पुढे जाऊ दोन्ही भारतीय संघाचा कर्णधार बनला. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.

(Shubman Gill Recall His Debute Match Memory Said About Ms Dhoni)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोच वेग तीच दहशत! उमराननंतर कश्मिरमधून आला आणखी एक स्पीडस्टार; व्हिडिओ पाहून म्हणाल, “वाह”
सूर्या नाही, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज बेस्ट; अनुभवी फिरकीपटूने सांगितले नाव


Next Post
Indian Player In Mount Maunganui

VIDEO: बे ओव्हल ग्राउंडवर टीम इंडियाचे पारंपरिक पद्धतीने 'वेलकम'; अय्यर, कुलदीपने शेयर केल्या पोस्ट

Shikhar-Dhawan

'तू जो मिला...', टीम इंडियाच्या 'गब्बर'ची मुलगा झोरावरसोबत जोरदार मस्ती, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

Photo Courtesy: Twitter/ICC

विश्वविजेत्या इंग्लंडचे ऑस्ट्रेलियासमोर लोटांगण! यजमानांची वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143