क्रिकेटटॉप बातम्या

Ashes ODI series; रोमांचक सामन्यात कांगारुंचा विजय, इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या महिला संघांमध्ये अ‍ॅशेस मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये तिन्ही फॉरमॅटच्या मालिका खेळल्या जातात. सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. ज्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने ही मालिका जिंकली आहे. महिला अ‍ॅशेसच्या तीन सामन्यांपैकी पहिले दोन सामने यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ 181 धावांचा पाठलागही करू शकला नाही आणि 21 धावांनी सामना गमावला. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकल्यामुळे संघाने केवळ सामनाच नाही तर मालिकाही गमावली आहे. मालिकेतील तिसरा सामना 17 जानेवारी रोजी होबार्ट येथे खेळला जाईल.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हा सामना तो कमी धावसंख्येचा होता. या सामन्यात इंग्लंड संघाची कर्णधार हीदर नाईटने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला खरे ठरवले आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला 180 धावांत गुंडाळले. यानंतर, इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 159 धावांत गुंडाळले. सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडकडून अलाना किंगने 4 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग व्यतिरिक्त किम गार्थने 3 तर मेगन शट आणि अ‍ॅश गार्डनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. छोट्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या पाच फलंदाजांना दुहेरी अंकाचा टप्पा ओलांडण्यात यश आले. यातील एका फलंदाजाने 47 धावा केल्या आणि दुसऱ्याने 35 धावा केल्या. असे असूनही संघाला 181 धावांचा पाठलाग करता आले नाही. आणि इंग्लिश संंघ 159 धावांत ढेपाळला. आशाप्रकारे कांगारु संघाने 21 धावांनी सामना जिंकला. या विजयासह मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा-

ऑस्ट्रेलियाच्या लज्जास्पद दौऱ्यानंतर बीसीसीआय कठोर भूमिकेत, खेळाडू आणि प्रशिक्षकांवर लादणार हे निर्बंध
“खूप झाले लाड…”, बीसीसीआयने खेळाडूंवर लादली नवी नियमावली, आढावा बैठकीत मोठा निर्णय
‘जसप्रीत बुमराहशी माझी तुलना करू नका’, कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया, वर्कलोड मॅनेजमेंटवरही सुनावले

Related Articles