---Advertisement---

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने संघ तर निवडला, पण ‘या’ दिग्गज क्रिकेटर्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम

On: बुधवार, सप्टेंबर 6, 2023 9:59 AM
Australia Team
---Advertisement---

वनडे विश्वचषकासाठी 2023 स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली असताना सर्व संघ तयारीला लागले आहे. भारताने 5 सप्टेंबरला विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेने ही आपला संघ जाहीर केला. आता अशात बुधवारी (दि. 06 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियन संघाने देखिल आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट संघटचा अष्टपैलू खेळाडू मार्नस लॅब्यूशेन याला संघातून वगळ्यात आले आहे. तर युवा अष्टपैलू कॅमरुन ग्रीन याला संघात स्थान दिले आहे. तो त्याच्या जिवनातील पलहिलाच विश्वचषक खेळताना दिसणार आहे. परंतू ऑस्ट्रेलियन संघाच्या संघआथ स्थान मिळालेल्या दिग्गज खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह कायम आहेत.

वनडे विश्वचषकासाठी तोंडावर असताना ऑस्ट्रेलियान संघाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीला समोर जावे लागत आहे. ऑस्ट्रेलियान संंघाचा कर्णधार पॅट कमिन्ससह स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांची विश्वचषकासठी निवड झालेली आहे. परंतू ते सध्या दुखापतशी लढत आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. संघाचा कर्णधार हाच सध्या दुखापतग्रस्त आहे. तर ग्लेन मॅक्सवेलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेला सुरवात होण्यापूर्वीच सराव करत असतना त्याला दुखापत झाली. तो कधीपर्यंत बरा होईल हे अजून सांगता येणार नाही.

ऑस्ट्रेलियान संघाचा महत्वपूर्ण फलंदाजी स्टीव्हन स्मिथ देखिल दुखापतीला झुंज देत आहे. तसेस कांगारुचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा ही अनेक दिवसांपासून दुखापतीच्या कारणाने संघाबाहेर आहे. यामुळे कांगारु संघाची विश्वचषकात गडबड होण्याची शक्यता आहे.

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड, ऍश्टन अगर, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क, सीन ऍबॉट. ( australia cricket team announce for world cup 2023)

महत्वाच्या बातम्या- 
BREAKING । वर्ल्डकप 2023साठी ‘कांगारूं’चा 15 सदस्यीय संघ घोषित; स्टार खेळाडू बाहेर, तर ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री 
“चहल खराखुरा मॅचविनर”, युझीला विश्वचषकासाठी संधी न मिळाल्याने निराश झाला दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---