आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. विश्वचषकासाठी भारतीय संघात अशा अनेक खेळाडूंच्या नावाचा समावेश नाही, ज्यांना निवडले जाण्याची शक्यता होती. त्या खेळाडूंपैकी एक युझवेंद्र चहल आहे. चहल याला भारतीय संघात संधी न दिल्याने भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आश्चर्य व्यक्त केले.
विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया देत आहेत. हरभजन सिंग याने एक ट्विट करत चहल याच्यासाठी पाठिंबा दर्शवला. त्याने लिहिले,
“माझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट आहे की, चहल या संघाचा भाग नाही. एक खराखुरा मॅच विनर’
विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात कुलदीप यादव एकमेव फिरकीपटू असून, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे फिरकी अष्टपैलू संघाचा भाग आहेत.
कधी होणार विश्वचषकाला सुरुवात?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार असून 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
(Harbhajan Singh Reaction On Yuzvendra Chahal Exclusion From ODI World Cup Sqaud)
महत्वाच्या बातम्या –
अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत 16 वर्षाखालील शिवम पडिया, प्रद्युम्न ताताचर यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
शतक हुकले आणि चाहत्यांचे हार्टब्रेक! यष्टीरक्षक फलंदाज आपल्याच चुकीने नर्व्हस नाइंटीवर धावबाद । VIDEO