---Advertisement---

अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत 16 वर्षाखालील शिवम पडिया, प्रद्युम्न ताताचर यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

---Advertisement---

पुणे, 4 सप्टेंबर, 2023: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमीच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात शिवम पडिया, प्रद्युम्न ताताचर यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत बिगर मानांकित शिवम पडियाने पाचव्या मानांकित आरव ईश्वरचा 6-4, 6-7(2), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. प्रद्युम्न ताताचरने सहाव्या मानांकित रोहन बजाजचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. आठव्या मानांकित नील केळकरने वरद उंद्रेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला. सातव्या मानांकित अर्जुन किर्तनेने ओमेश औटीवर 6-2, 6-0 असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित नीरज रिंगणगावकरने तेज ओकचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचे उद्घाटन एमक्यूअर फार्मासिटीकल लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष राजेश नायर, सीएसआर विभागाचे मुख्य गिरीश घनवट, डेक्कन जिमखानाच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहिर केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन किर्तने, रिया किर्तने, स्पर्धा सुपरवायझर निहारिका गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी:
विश्वजीत सणस(1) वि.वि.अर्णव बनसोडे 7-6(1), 6-4;
आनंद दोंतमेट्टी वि.वि.स्वर्णिम येवलेकर 6-4, 6-4;
शार्दुल खवले वि.वि.वरद पोळ 5-7, 6-1, 6-2;
शिवम पडिया वि.वि.आरव ईश्वर(5) 6-4, 6-7(2), 6-4;
नीरज रिंगणगावकर(4)वि.वि.तेज ओक 7-6(3), 6-3;
प्रद्युम्न ताताचर वि.वि.रोहन बजाज(6) 6-3, 6-2;
नील केळकर(8)वि.वि.वरद उंद्रे 6-0, 6-2;
अर्जुन किर्तने (7)वि.वि.ओमेश औटी 6-2, 6-0;
क्रिशांक जोशी वि.वि.अभिराम निलाखे 4-6, 6-4, 7-5;
सूर्या काकडे वि.वि.आदित्य गायकवाड 7-6(2), 6-3;
दक्ष पाटील वि.वि.सिद्धेश खाडे 6-2, 6-3;

महत्वाच्या बातम्या – 
मोठ्या मनाचा अश्विन! विश्वचषक संघातून वगळूनही खचला नाही दिग्गज, ट्वीट करत म्हणाला…
नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत रोहितला राग अनावर; स्पष्टच बोलला, ‘…मी उत्तर नाही देणार’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---