आशिया चषक 2023चा सहावा सामना ग्रुप ब मधील श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा आणि निर्णायक सामना होता. श्रीलंकन संघाचा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज कुसल मेंडिस याने या सामन्यात अप्रतिम खेळी केली. त्याचे शतक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, फलंदाज याठिकाणी नर्व्हस नाईंटीचा शिकार बनला.
कुसल मेंडिस () 84 चेंडूत 92 धावा करून बाद झाला. त्याने यादरम्यान 6 चौकार आणि 3 अप्रतिम षटकार मारले. श्रीलंकेच्या डावातील 40 वे षटक फिरकीपटू राशिद खान याने टाकले. षटकातील पहिल्याच चेंडूवर मेंडिस धावबाद झाला. या विकेटमुळे श्रीलंकन चाहत्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली. कुसल मेंडिसच्या रुपात श्रीलंकन संघाने सहावी विकेट गमावली आणि त्यावेळी संघाची धावसंख्या 226 होती. मेंडिसच्या विकेटनंतर याच षटकात श्रीलंकेची सातवी विकेट दासून शनाका याच्या रुपात केली. शनाकाने अवघ्या 5 धावा केल्या. (Kusal Mendis run out on 92 runs)
https://twitter.com/12th_khiladi/status/1699034683189940510?s=20
The most heartbreaking way to miss a hundred…
Shanaka on strike. He hit straight to Rashid Khan. Rashid missed the catch and the ball hit the stumps at the other end. Kusal Mendis run-out for 92. Well played.#AsiaCup2023 pic.twitter.com/Ils0mQVg1u
— 🌧🌧🌧 (@MeerAdn85868050) September 5, 2023
अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशिद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन –
पाथूम निसांका, दिमूथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासून शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.
महत्वाच्या बातम्या –
नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत रोहितला राग अनावर; स्पष्टच बोलला, ‘…मी उत्तर नाही देणार’
इंडिया विरुद्ध भारत वादावर सेहवागचे मोठे वक्तव्य, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या