भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका पुढील महिन्यात सुरू होत आहे. 9 फेब्रुवारी रोजी चार सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू होईल. मागील सोळा वर्षापासून भारतात कसोटी मालिका जिंकण्याचे प्रयत्न ऑस्ट्रेलिया संघ करत आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने मालिकेच्या आधीच मायदेशात राहून या मालिकेची तयारी सुरू केली आहे.
ऑस्ट्रेलियन संघासाठी चार सामन्यांची ही मालिका अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण, मागील 16 वर्षांपासून ते भारतात कसोटी मालिका विजय साजरा करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन संघाला भारतात प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांचा सामना करणे कठीण जाते. त्याच कमजोरीवर मात करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन संघाने सिडनी येथे फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या बनवल्या आहेत. त्याच खेळपट्ट्यांवर ऑस्ट्रेलियन संघ सराव करतोय. या खेळपट्ट्यांवर अनेक भेगा तसेच खडबडीत जागा आहेत. ज्यावर चेंडू मोठ्या प्रमाणात फिरकी घेताना दिसतोय. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय फिरकीपटूंचा सामना करावा लागेल. या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या तीन दर्जेदार फिरकीपटूंचा समावेश आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चार सामन्यांच्या या मालिकेला नागपूर येथे 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली, तिसरा सामना धर्मशाला व अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. सध्या भारतीय क्रिकेट संघाकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. भारताने 2020-2021 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका आपल्या नावे केली होती. त्यामुळे आता भारताला भारतात पराभूत करण्याचे शिवधनुष्य ऑस्ट्रेलियन संघाला उचलावे लागणार आहे.
(Australia Cricket Team Practice On Spin Friendly Wickets In Sydney)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो