ऑस्ट्रेलियन संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखली जाते. पाच वेळा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ असला, तरी गुरुवारी (12 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या नांग्या ठेचल्या. संघाची धावसंख्या अवघी अवघी 65 असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या पाच विकेट्स गमावल्या.
ऑस्ट्रेलियाला या सामन्यात जिंकण्यासाठी 312 धावांची लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या पाच विकेट्स संघाची अवघ्या 65 धावांवर गमावल्या. यात सलामीवीर मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, जोश इग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश होता. वनडे विश्वचषकाती पहिल्या वाच विकेट्स गमावल्यानंतर ही ऑस्ट्रेलियाची चौथी सर्वात कमी धावसंख्या ठरली. स्टीव स्मिथला तिसऱ्या पंचांनी एलबीडब्ल्यू बाद घोषित केल्यानंतर फलंदाज स्वतः अश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले.
विश्वचषकात पाच विकेट्सच्या नुकसानावर ऑस्ट्रेलाची सर्वात कमी धावसंख्या
5/32 विरुद्ध इंग्लंड (1975)
5/52 विरुद्ध भारत (1983)
5/61 विरुद्ध वेस्ट इंडीज (1975)
5/65 विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2023)
(Australia did not record five first wickets cheaply against South Africa)
विश्वचषकातील दहाव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
महत्वाच्या बातम्या –
खुशखबर! शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार? सरावालाही केली सुरुवात
तिसऱ्या वर्ल्डकप मॅचमध्ये भारत-पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या कुणाचे पारडे जड