जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने रविवारी (दि. 11 जून) भारतीय संघाला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. डब्ल्यूटीसी अंतिम सामना जिंकताच बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलिया संघ सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा संघ बनला. चला तर ऑस्ट्रेलियाच्या विजयी कामगिरीवर एक नजर टाकूयात…
ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी ट्रॉफी विजय
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने भारताला डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात पराभूत करताच खास विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलिया सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वात पहिली ट्रॉफी ही 1987च्या वनडे विश्वचषकाच्या रूपात पटकावली होती. त्यानंतर त्यांनी 1999च्या वनडे विश्वचषकालाही गवसणी घातली. पुढे 4 वर्षांनी 2003सालचा वनडे विश्वचषकही ऑस्ट्रेलियानेच जिंकला.
यानंतर 2006च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरदेखील ऑस्ट्रेलियाने नाव कोरले होते. याव्यतिरिक्त 2007 सालचा वनडे विश्वचषकही ऑस्ट्रेलियाच्याच नावावर झाला होता. यानंतर त्यांनी अवघ्या दोन वर्षातच म्हणजेच 2009मध्ये दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यानंतर त्यांना पुढील विश्वचषकासाठी 6 वर्षे वाट पाहावी लागली. त्यांनी 2015च्या विश्वचषकाची ट्रॉफीदेखील आपल्या खिशात घातली होती. त्यानंतर पुन्हा 6 वर्षांनंतर 2021मध्ये पहिला वहिला टी20 विश्वचषकही आपल्या नावावर केला आणि आता 2023ची डब्ल्यूटीसी ट्रॉफीही आपल्या नावावर केली.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघ आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा संघ बनला. (Australia has completed the ICC 9 Trophy)
ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्व आयसीसी ट्रॉफी
वनडे विश्वचषक 1987
वनडे विश्वचषक 1999
वनडे विश्वचषक 2003
चॅम्पियन्स ट्रॉफी 2006
वनडे विश्वचषक 2007
चॅम्पियन्स ट्रॉफी 2009
वनडे विश्वचषक 2015
टी20 विश्वचषक 2021
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023*
भारताचा 209 धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियाने भारतापुढे एकूण 444 धावांचे आव्हान दिले होते. त्यात पाचव्या दिवशी भारतीय संघापुढे विजयासाठी 280 धावांचे आव्हान होते. तसेच, भारताच्या हातात 7 विकेट्स होत्या. मात्र, भारताने नियमित अंतराने सर्व विकेट्स गमावल्या 234 धावांवर नांग्या टाकल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 209 धावांनी जिंकला (Australia has completed the ICC 9 Trophy)
महत्वाच्या बातम्या-
WTC Final । आयसीसी ट्रॉफीचा वनवास कायम! ऑस्ट्रेलियाकडून रोहितसेनेचा मानहानीकारक पराभव
अनुष्काने ओव्हलवर येऊन केली चूक! विराटची विकेट पडताच अभिनेत्री जोरात ट्रोल