क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी(१२ नोव्हेंबर) भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी १७ जणांचा संघ घोषित केला आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबर पासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व टिम पेन करणार आहे.
तसेच या संघात विल पुकोवस्की आणि कॅमेरॉन ग्रीन या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. याबरोबरच सीन ऍबॉट, मिशेल स्वेप्सन आणि मायकल नासीर यांना देखील कसोटी संघात स्थान मिळाले आहे. या पाचही जणांनी अजून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
या संघाचे उपकर्णधारपद वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, नॅथन लायन या अनुभवी खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे.
याबरोबरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १९ जणांचा ऑस्ट्रेलिया अ संघ देखील जाहिर केला आहे. अ संघ भारतीय संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. अ संघात कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या ९ खेळाडूंनाही स्थान दिले आहे.
अशी होईल कसोटी मालिका –
पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरू होईल. वेळापत्रकानुसार ऍडलेडमध्ये भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला दिवस- रात्र कसोटी सामना खेळेल, तर मेलबर्नमध्ये २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळतील. तर तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सुरु होईल. चौथा कसोटी सामना १५ ते १९ जानेवारी दरम्यान खेळला जाईल.
या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात टी२० आणि वनडे मालिका होणार आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलिया-
टीम पेन (कर्णधार), सीन ऍबोट, जो बर्न, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशाने, नॅथन लायन, मायकेल नासीर, जेम्स पॅटिन्सन, विली पुकोवस्की, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन, मेथ्थ्यू वेड व डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया अ संघ –
सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, जो बर्न्स, जॅक्सन बर्ड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), हॅरी कॉनवे, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेंड्रीक्स, निक मॅडिनसन, मिशेल मार्श (फिट असेल तर), मायकेल नासीर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, मार्क स्टेकी, विल सदरलँड, मिशेल स्वेप्सन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला वनडे – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे -०२ डिसेंबर – कॅनबेरा
पहिला टी२० – ०४ डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी२० – ०६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी२० – ०८ डिसेंबर – सिडनी
पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर – ऍडिलेड
दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ०७ जानेवारी ते ११ जानेवारी – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ जानेवारी ते १९ जानेवारी – ब्रिस्बेन
महत्त्वाच्या बातम्या –
-मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
-भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर