ऍडलेड । येथे सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा महान गोलंदाज जिमी अँडरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा वाताहत झाली आहे. त्यांचा संपूर्ण संघ ५८ षटकांत १३८ धावांवर गारद झाला.
जिमी अँडरसनने डावात ब्राँकॉट(४), ख्वाजा(२०), हॅन्ड्सकॉम्ब(१२), ल्योन(१४) आणि स्टार्क(२०) यांना बद्द केले. अँडरसनने या डावात २२ षटकांत ४३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याला ख्रिस वोक्सने १६ षटकांत ३६ धावा देत ४ विकेट्स घेत चांगली साथ दिली.
याबरोबर ३५४ धावांचे लक्ष चौथ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंड समोर ठेवले आहे.