वनडे विश्वचषक 2023 चा 43वा सामना बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत जागा पक्की करून बसला आहे. तर दुसरीकडे बांगलादेश संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा आधीच मावळल्या आहेत. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन स्टार खेळाडू या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत.
ऑस्ट्रेलियासाठी मागच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने जबरदस्त खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला होता. मॅक्सवेलेने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिलाच सोबतच आपले द्विशतकही पूर्ण केले. सामन्यादरम्यान मॅक्सवेलचे स्नायू तानले गेल्याने त्याला नीट चालता देखील येत नव्हते. पण संघ अडचणीत असल्यामुळे त्याने आपला खेळ सुरू ठेवला आणि सामना जिंकला.
दुसरीकडे मिचेल स्टार्क हा उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. खबरदारीचा उपाय आणि खेळाडूंचा वर्कलोड लक्षात घेत संघ व्यवस्थापनाने मॅक्सवेल आणि स्टार्क यांना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली. पुण्यातील हा सामना सुरू होण्याआधी स्टार्क यष्टीरक्षणाचा सराव करताना दिसला होता. यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले होते. मात्र, प्रत्यक्ष प्लेइंग इलेव्हन समोर आल्यानंतर स्टार्कचे नाव त्यात नव्हते.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), ऍडम झॅम्पा, जोश हेझलवूड.
बांगलादेश – लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, तौहिद हृदोय, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
(Australia have won the toss against Bangladesh and they’ve decided to bowl first)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय फलंदाजाने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट; म्हणाली, ‘या लिजेंड खेळाडूचा…’
धक्कादायक! क्रिकेट बोर्डातील फेरबदलांनंतर आयसीसीचा टोकाचा निर्णय, श्रीलंकेचे सदस्यत्व थेट रद्द