---Advertisement---

पहिल्या वनेडत नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय, शिखरबरोबर ‘हा’ खेळाडू येणार सलामीला

---Advertisement---

सिडनी। शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) वनडे सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून जवळपास ७ महिन्यांनी भारतीय संघ क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

या सामन्यात भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयंक अगरवाल हे सलामीला फलंदाजी करतील, असे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. तर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करेल. तसेच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल.

याबरोबरच या सामन्यासाठी ११ जणांच्या भारतीय संघात हार्दिक पंड्या, आणि रविंद्र जडेजाला अष्टपैलू म्हणून संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज संघात आहेत. तसेच युजवेंद्र चहल फिरकी गोलंदाज म्हणून संघात आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या ११ जणांच्या संघात स्टिव्ह स्मिथचे पुनरागमन झाले आहे. त्याला मिशेल मार्शऐवजी संघात संधी मिळाली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया संघात पहिल्या वनडेसाठी कर्णधार ऍरॉन फिंच, डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन या फलंदाजांचा समावेश आहे. तर ऍलेक्स कॅरे यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत.

गोलंदाजांच्या फळीत ऑस्ट्रेलियाने अंतिम ११ जणांच्या संघात पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांना तर ऍडम झम्पा या फिरकी गोलंदाजाला स्थान दिले आहे.

असा आहेत पहिल्या वनडेसाठी संघ – 

भारतीय संघ –

शिखर धवन, मयंक अगरवाल, विराट कोहली(कर्णधार) , श्रेयस अय्यर, केएल राहुल(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा,मोहम्मद शमी, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल

ऑस्ट्रेलिया संघ –

डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, मार्नस लब्यूशेन, मार्कस स्टॉयनिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेजलवुड.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---