भारतीय क्रिकेट संघ सध्या तिन्ही क्रिकेट प्रकारात जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे. भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये असून सातत्याने एका पाठोपाठ एक असे विजय मिळवताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले असून मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने जिंकली असून त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दिग्गजांचे पुनरागमन
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या सामन्यात भारताचे स्टार खेळाडू परतले आहेत. पहिल्या दोन सामन्यासाठी विश्रांती देण्यात आलेले खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांचे तिसऱ्या वनडेत पुनरागमन झाले आहे. तसेच, या सामन्यातून बरेच खेळाडू बाहेर पडले आहेत. त्यात ईशान किशन, आर अश्विन यांचा समावेश आहे. अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1706935523225604129
तसेच, दुसऱ्या वनडेतून बाहेर असलेला ऑस्ट्रेलियन संघात पाच बदल झाले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचे तिसऱ्या वनडेत पुनरागमन झाले आहे. तसेच, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांचे पुनरागमन झाले आहे. तन्वीर संघा हा वनडे पदार्पण करत आहे.
आमने-सामने आकडेवारी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडेत एकूण 148 सामने खेळले गेले आहेत. यातील 56 सामने जिंकण्यात भारताला यश आले आहे, तर उर्वरित 82 सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडला आहे. मात्र, या मालिकेतील सामन्यांविषयी बोलायचं झालं, तर भारताने पहिला सामना भारताने 5 विकेट्सने आणि दुसरा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 99 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, पहिल्या दोन्ही सामन्यात केएल राहुल (KL Rahul) याने भारताचे नेतृत्व केले होते. आता तिसऱ्या सामन्यात कोण विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Australia have won the toss and have opted to bat Against India)
तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया
मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
हेही वाचा-
अब आयेगा मजा! तिसऱ्या वनडेत कमिन्स ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांच्या ‘या’ स्टार खेळाडूंचे पुनरागमन
वर्ल्डकपपूर्वी अश्विनबाबत रोहित शर्माची सर्वात मोठी प्रतिक्रिया, वाचून क्रिकेटप्रेमींनाही होईल आनंद




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा