---Advertisement---

भारताच्या क्लीन स्वीपचे भाकीत करणाऱ्या दिग्गजांना लक्ष्मणचे सडेतोड प्रत्युतर, म्हणाला…

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 7:12 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी बर्‍याच माजी दिग्गज खेळाडूंनी आपली मते आणि भाकीत मांडले होते. त्यामधे मार्क वॉ आणि रिकी पॉटिंग यासारख्या खेळाडूंचा सुद्धा समावेश होता. त्यांनी भारतीय संघ ही मालिका 0-4 या फरकाने गमावले असे भाकित केले होते. मात्र आता व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या खेळाडूंवर निशाणा साधला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. यामधे दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत आहे. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वी मार्क वॉ आणि रिकी पॉटिंग यासारख्या खेळाडूने भाकीत केले होते,की भारतीय 0-4 फरकाने मालिका गमावेल पण तसे झाले नाही. त्यामुळे भारतीय दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अशा दिग्गज खेळाडूंचा समाचार घेतला आहे.

क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ 

व्हीव्हीएस लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात म्हणाले, “क्रिकेट हा खेळ पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही पुढे काय होईल याचे तर्क नाही लावू शकत. भारतीय संघ एॅडलेडमध्ये 36 धावसंख्येवर सर्वबाद झाला. विराट कोहली मायदेशी परतला, शमी मालिकेतून बाहेर पडला, असे झाल्यानंतर सुद्धा कोणत्या संघाला संपलेला किंवा गेलेला संघ समजू शकत नाही, विशेषकरून या भारतीय संघाला तर नाहीच. ”

कोणत्याही संघाला संपलेला समजू नये

व्हीव्हीएस लक्ष्मण पुढे म्हणाले,” साल 2018-19 मध्ये आपण पाहिले होते की, भारताने कशा प्रकारे ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले आणि पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे मला वाटते कोणत्याही संघाला संपलेला समजू नये.”

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना एॅडलेड येथे खेळला गेला होता. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळला खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्यानंतर दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला गेला या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर सोबत मालिकेत बरोबरी केली.

महत्वाच्या बातम्या:

चौथ्या कसोटीचे आयोजन स्थळ बदलण्याच्या चर्चांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, म्हणाले

पुन्हा बाहेर जेवणासाठी जाऊ नकोस! शुभमन गिलला मिळाला मजेशीर सल्ला

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, उद्या मिळू शकतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---